Share

महाराष्ट्र झुकणार नाही..! माझे शब्द लिहून ठेवा ‘बाप – बेटे जेलमध्ये जाणार’, राऊतांनी फोडली डरकाळी

sanjay raut

सध्या राज्याच्या राजकारणात भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्धाचा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य करतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते.

त्यानंतर राऊतांनी देखील थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर प्रतिहल्ला चढवत सर्व आरोपांवर खणखणीत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकूपर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

त्यामुळे सध्या नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. यामुळे शिवसेनेवर आरोपांची जोड उठवणाऱ्या किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसला आहे. नील सोमय्याचे पीएमसी बँक घोटाळ्याली प्रमुख आरोप राकेश वाधवान याच्याशी संबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

तसेच पीएमसी बँक घोटाळ्याली पैसा नील सोमय्यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोपही राऊत यानी केला होता. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. ‘मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेलमध्ये जाणार’ असं सूचक ट्विट राऊत यांनी केलं आहे.

सध्या राऊत यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात तूफान चर्चा सुरू आहे. ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटलं आहे की, “माझे शब्द अधोरेखित करा…. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील”.

https://twitter.com/rautsanjay61/status/1498840404258848773?s=20&t=tcARcUEN9yhRR52fK2eiuw

तसेच पुढे ट्विटमध्ये राऊत यांनी म्हंटले की, ‘”महाराष्ट्र झुकेगा नहीं”. तसेच या ट्विटसोबत संजय राऊत यांनी वाघाचा फोटो पोस्ट केला. राऊत यांनी याआधीही खूपदा आरोप केला आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून राजकीय विरोधकांवर दबावासाठी वापर केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या
मुलाला ‘या’ भयानक आजारापासून वाचवण्यासाठी माजी पोलिस बनला चोर, कहाणी वाचून कोसळेल रडू
भाजप खासदारावर कार्यकर्त्यानेच केले कोट्यावधींच्या फसवणूकीचे आरोप; वाचा पुर्ण प्रकरण…
सॅल्युट! सॉफ्टवेअरची नोकरी सोडून आदिवासी शेतकऱ्यांना केली मदत, तीन पटीने वाढवले त्यांचे उत्पन्न
वयाच्या ५५ व्या वर्षी शिकली सेंद्रिय शेती, आता उत्पनात झाली तिप्पट पटीने वाढ, कमावतात लाखो

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now