Share

VIDEO: लॉक अपमध्ये कंगनावर भडकली बबिता फोगाट; म्हणाली, “माझ्यापासून जरा लांब राहा नाहीतर..”

मागील काही दिवसांपासून एक नवीन शोची चर्चा सतत सुरू आहे. त्याचबरोबर या शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या एक अभिनेत्रीची देखील चर्चा होत आहे. ही अभिनेत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. ती म्हणजे बॉलिवूडची क्वीन म्हणजेच कंगना राणावत होऊ. कंगना लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ती ‘लॉक अप’ हा शो घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

सध्या या शोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच या शोचा एक प्रोमो देखील प्रदर्शित झाला. या शोचे प्रोमो पाहून असे समजते की, नेहमीच वादात राहणारी कंगना पुन्हा एकदा धमाका करायला सज्ज झाली आहे. तिला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

या प्रोमोमध्ये कंगना आणि स्पर्धक बबिता फोगट यांच्यात जोरदार वादविवाद होत असलेले दिसून येत आहे. तसेच चाहत्यांकडून या शोला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कंगना बबिता फोगाटवर आरोप लावताना दिसतं आहेत. तर बबिता तिला प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

https://youtu.be/eko2D6rbmPM

सध्या ‘लॉक अप’ या शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना आणि बबिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. अर्थात हा शो अजून सुरू झालेला नाही, पण प्रोमो पाहून हा शो किती वादग्रस्त असू शकतो, याचा अंदाज लावला जात आहे. तसेच शोबद्दल चाहत्यांना ही उत्सुकता लागून राहिली आहे.

 

या प्रोमोमध्ये कंगना स्पर्धक बबिता फोगटला विचारत आहे की, “बबिताने आपल्या मेंदूचा वापर करून कुस्तीच्या आखाड्यात अनेक पदके जिंकली आहेत. पण राजकारणाच्या आखाड्यात तिला तिच्या मेंदूचा का वापर करता आला नाही?” इतके बोलताच कंगनाचा हा प्रश्न ऐकून बबिता भडकते आणि कंगनाला उत्तर ही देते.

 

अशामध्येच बबिता कंगनाला समज देत म्हणते की, “तू माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत. माझ्यापासून थोडं लांब राहा. नाहीतर मला धोबीपछाड करायला वेळ नाही लागणार. ” बबिताचे हे उत्तर ऐकून कंगना थोडी शांत झाली दिसून येते. आता या पुढे या दोघींचा वाद किती वाढतो हे पाहण्यासारखे आहे.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now