Share

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अजबच हट्ट; ‘माझ्या कुत्र्याची सुटका करा तरच मी भारतात येईल’

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे, अशावेळी युक्रेन वरती होत असलेला रशियाचा भीषण हल्ला पाहून युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी देखील सुखरूप नसलेले पहिला मिळत आहेत. अशावेळी त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारतीय सरकार हालचाली करत आहे. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा एका भारतीय मुलाने त्याच्या सोबत त्याच्या कुत्र्याची देखील सुटका करा असा हट्ट धरला आहे.

रिषभ कौशिक असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो युक्रेनमध्ये अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकतो आहे. त्याने आपल्यासह कुत्र्याचीही सुटका करण्याचा हट्ट धरला आहे. कुत्र्याशिवाय युक्रेन सोडण्यास त्याने नकार दर्शविला आहे.

त्याच्या कुत्र्याचे नाव मालिबू नाव आहे. सध्या त्याला आपल्या सोबत भारतात आणण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप भारतीय वकीलाकडूनही काहीही मदत मिळत नाही. कुणीच अद्ययावत स्थितीची माहिती देत नाही, असा आरोप त्याने केला आहे.

https://fb.watch/br-aou5uAa/

यासंदर्भात भारत सरकारच्या दिल्लीतील अँनीमल क्वारंटाइन अँड सर्टिफिकेशन सर्व्हिस तसेच भारतीय वकीलाशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे कौशिकचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला, मात्र संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा आरोप त्याने केला.

तसेच म्हणाला की, माझ्याकडे विमान तिकिटाची मागणी केली जात आहे, पण युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असताना मी तिकीट कुठून आणू, कुत्र्याला बरोबर नेता यावे म्हणून कागदपत्रांची पुर्तता करीत आहे, मात्र अधिकारी दर वेळी इतरही अनेक कागदपत्रे मागत असल्याचेही त्याने नमूद केले.

सध्या कौशिक युक्रेन मध्ये एका खंदकात लपला आहे. त्याचा कुत्राही त्याच्यासोबत आहे. त्याने सांगितले की, धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजायचा थांबला की तो बाहेर येतो. पण, स्फोटांच्या आणि भोंग्याच्या आवाजामुळे त्याचा कुत्रा सतत रडत असल्याचे त्याने सांगितले आहे. आता पुढे या श्वानप्रेमी तरुणाची युक्रेन मधून त्याच्या श्वानासोबत सुटका होईल का हे पाहणे आवश्यक आहे.

 

इतर

Join WhatsApp

Join Now