Share

कॉमेडी व्हिडिओ बनवून सोलापूरच्या गणेश आणि योगिताने कमावले पैसे; आता लोकांकडून येताय धमकीचे फोन

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार हे प्रसिद्धी मिळवत असतात. त्यांच्या मनोरंजन करणाऱ्या आणि कॉमेडी व्हिडिओंमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होताना दिसतो. पण अनेकदा काही कलाकारांना त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. (youtuber yogita and ganesh)

आता असाच एक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या मोहोळ येथील गणेश शिंदे आणि योगिता शिंदे हे आपल्या युट्युब चॅनेलवरुन वेगवेगळ्या व्हिडिओ शेअर करत असतात. या व्हिडिओंमध्ये त्यांच्या दोन मुली खुशी आणि शिवानी या देखील दिसून येत असतात.

गणेश आणि योगिता यांच्या या व्हिडिओंना अल्पवाधीत खुप चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे या कुटूंबाची आर्थिकस्थिती स्थिरावताना दिसत आहे. आलेल्या पैशांनी गणेश आणि योगिताने एक घर बांधले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक कार घेतली होती, त्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.

तसेच एवढे पैसे आले कुठून असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर त्यांना कॉल्स आणि मेसेजवरुन धमक्याही येऊ लागल्या आहे. याबाबत त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सुरुवातीला आमच्या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळत नव्हता, पण खुशीच्या जन्मानंतर व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. योगिताची डिलिव्हरी झाली तेव्हा आर्थिकस्थिती खुप खराब होती, त्यामुळे आम्ही लोकांना मदतीचे आवाहन केले होते, त्यानंतर अनेकांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार.

तसेच ते पैसे उपचारासाठी तेव्हाच खर्च करण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले आहे. लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी पैशांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडिओंना उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे युट्युबकडून आम्हाला पैसे मिळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गणेश आणि योगिता यांच्या चॅनेलला ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केले आहे. त्यांच्या चांगल्या व्हिडिओंमुळे लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांना युट्युबकडून पैसे मिळत आहे. याच पैशातून त्यांनी कार खरेदी केली आहे आणि घर बांधले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रात्रीचं जेवण केलं अन् मृत्यूच्या दाढेत अडकलं कुटुंब; विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू
युक्रेनच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झालं नेमकं संभाषण वाचा सविस्तर….
‘मी काहीही चोरलेले नाही…, मात्र, तुम्ही भिकारी’, घरात काहीच न मिळाल्यानं चोराची सटकली

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now