लग्न आहे की सर्कस? प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ तूफान व्हायरल; हसून हसून दुखेल तुमचं पोट

आतापर्यंत तुम्ही अनेक प्री-वेडिंग फोटोशूट पाहिले असतील. यामध्ये तुम्हाला सुंदर लोकेशन्स तर बघायला मिळतातच शिवाय फोटोग्राफरची क्रिएटिव्हिटीही पाहायला मिळते. त्यामुळे फोटोग्राफर्स कपल्सला त्यांचे फोटोशूट अविस्मरणीय बनवण्यासाठी बऱ्याचदा हटके आयडिया देताना दिसतात. (pre wedding photoshoot video viral)

आता सध्या अशाच एका प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजच्या जमान्यात सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे, ज्यामुळे लोकांना हसण्याची आणि हसवण्याची संधी मिळत आहे. असेच काहीसे व्हायरल होत असलेल्या प्री वेडींग व्हिडिओ सोबत झाले आहे.

हा व्हिडिओ पाहून लोकांना हसूच आवरेनासे झाले आहे. हा व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर व्हायरल झाला आहे. मात्र, तो कुठला आहे, याबाबत माहिती नाही. हा व्हिडिओ चेतना नावाच्या ट्विटर यूझरने @Tall_Dreams या हँडलने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतं आहे.

तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ एका मंदिरात शूट केल्याचे दिसत आहे. मुलगी नृत्याच्या पोझमध्ये आहे, तर मुलगा हातावर उभा आहे. काही यूझर्सनी तर लग्न ही सर्कस बनल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओ पोस्टला सुमारे शंभर लोकांनी लाईक केले आहे, तर 1 हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. फोटोग्राफरने एका कपलचा एक मस्त फोटो काढण्यासाठी चिखलाने भरलेली जागा निवडली होती. पण फोटोग्राफरला या ठिकाणाहून शेवटी काय साध्य करायचे होते हे समजण्यापलीकडचे होते.

फोटोशूटच्या प्लॅननुसार मुलाने मुलीला उचलायचे होते. मात्र मुलाने मुलीला उचलताच तो चिखलात घसरला आणि दोघेही तिथेच पडले. त्यानंतर दोघेही हसायला लागले. 29 डिसेंबरला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार फलंदाज संघाच्या बाहेर
पिवळ्या साडीतील मॅडम परतल्या ड्युटीवर, मतदानाच्या दिवशी पुन्हा बनल्या चर्चेचा विषय
व्हॅलेंटाईन डे दिवशी पतीने लॉटरीचं तिकीट दिल्याने संतापली पत्नी, नंतर त्याच लॉटरीतून जिंकले १० कोटी
नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, किरीट सोमय्यांचा इशारा