शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या त्यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’मध्ये व्यस्त आहेत. नुकतीच बातमी आली होती की दीपिका-शाहरुखवर एक रोमँटिक गाणे शूट करण्यासाठी चित्रपट निर्माते स्पेनला जाण्याच्या तयारीत आहेत. शाहरुखला चित्रपट पूर्णपणे परफेक्ट बनवायचा आहे.(Look at Shah Rukh Khan’s ‘Pathan’ leaked)
याचदरम्यान शाहरुखचा पठाण लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. सॉल्ट आणि पेप लुक, वाढलेले केस यामध्ये किंग खान एकदम वेगळा दिसतो. आपल्या सुपरस्टारला पहिल्यांदाच अशाप्रकारे पाहून चाहतेही खूप खूश आहेत. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या लुकला घेऊन प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
https://www.instagram.com/p/CaMKhTAMclH/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील हा लूक असल्याचा दावा केला जात आहे. यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा फोटो मॉफ्ड केलेला आहे. शाहरुखचा हा फोटो फोटोशॉपद्वारे बनवण्यात आले आहे.
शाहरुखने हे फोटोशूट 4 वर्षांपूर्वी सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी केले होते, जे आता फोटोशॉप करण्यात आले आहे. डब्बू रतनानीने 2 नोव्हेंबर 2017 रोजी शाहरुखचा हा फोटो त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता. आता शाहरुखचा हा फोटो एडिट करून त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचा नवा लूक असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटात शाहरुख खान दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारत आहे. वॉर, बँग बँग, सलाम नमस्ते आणि अंजाना अंजानी फेम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खानचा एक खास कॅमिओ असेल, जो रॉ एजंट टायगर उर्फ मनीष चंद्राची भूमिका पुन्हा साकारणार आहे.
पठाणचे संगीत विशाल-शेखर जोडीने दिले आहे आणि 2022 च्या अखेरीस हा चित्रपट पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे, पण अद्याप चित्रपटाची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही. त्याचवेळी शाहरुखकडे राजकुमार हिरानी यांचा आणखी एक अनटायटल चित्रपट आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली; डझनभर आजारांसोबत किडनी फक्त 20 टक्के कार्यरत…
ऋतिक रोशन पुन्हा दिसला त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत, व्हायरल फोटोनंतर अफेअरच्या चर्चांना उधाण
‘पावनखिंड’ने विक्रम रचला! अवघ्या तीन दिवसात कमावला ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला..