शोले स्टाईल मारत आपल्या प्रियसीया लग्नाची मागणी घालणारे कित्येक मजनु आजवर आपण पाहिले आहेत. मात्र दारुच्या बाटलीसाठी शोले स्टाईल मारणारा तरुन औरंगाबादच्या पाचोडमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. या तरुणाने चक्क ‘देशी दारूची बाटली’ मिळावी म्हणून टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे.
तरुणाच्या या शोले स्टाईल आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मिडीयाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी हा तरुण पाचोड येथील भारतीय संचार निगमच्या कार्यालयांमधील टॉवरवर चढला. त्यानंतर त्याने मला एक देशीची बाटली द्या, तरच मी खाली येतो, अन्यथा मी वर बसून राहील अशी गावकऱ्यांना मागणी केली.
या अजब मागणीला ऐकून गावकरी देखील चकित झाले. यावेळी गावकऱ्यांनी तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी देखील तरुणाचे गोंधळ घालण्याचे काम सुरुच होते. शेवटी या शोले स्टाईल तरुणाला दारुची बाटली देण्याचे आश्वासन गावकऱ्यांनी दिल्यानंतर तो खाली आला.
यामध्ये तरुणाचा हा प्रकार तब्बल तीन ते चार तास सुरु होता. याकाळात त्याने सर्वांनाच गोंधळू टाकले होते. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार सुरु असताना तरुणाने मद्यपान केले होते. ज्याकारणाने तरुण टाँवरवरुन खाली पडण्याची भिती गावकऱ्यांना वाटत होती.
दरम्यान तरुणाच्या या शोले स्टाईल आंदोलनाची चर्चा सगळीकडेच झाली आहे. यापूर्वी देखील प्रियसीचा होकार मिळवण्यासीठी आणि आपले म्हणणे पटवून देण्यासाठी अनेक तरुणांनी शोले स्टाईल वापरली आहे. परंतु दारूसाठी शोले स्टाईल आंदोलन करणारा तरुण पाहिल्यांदाच समोर आला आहे.