राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा शोध घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोर्लई गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते बाईक आणि गाड्या घेऊन आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
तसेच सोमय्या येताच शिवसैनिकांनी ‘निमका पत्ता कडवा है…’ ‘चलो जाव, चलो जाव, किरीट सोमय्या चले जाव’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनीही ‘किरीट सोमय्या आगे बढो’च्या घोषणा देत सोमय्यांचं समर्थन केलं. सोमय्यांसोबत भाजप कार्यकर्ते येत असल्याचं माहीत पडताच शिवसैनिकांनीही कोर्लईच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर गर्दी केली.
सोमय्या यांच्या कोर्लई दौऱ्यावर सरपंच प्रशांत मिसाळ यांनी जोरदार टीका केली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना मिसाळ म्हणाले, ‘माहितीच्या अधिकारातून सोमय्यांनी ही माहिती मागवली, तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे, आज ते ग्रामपंचायत कार्यालयात आले काही न बोलता पत्र देऊन गेले.’
आज फक्त त्यांना ड्रामाबाजी कायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे. हा फक्त गावाला बदनाम करण्याचा डाव आहे, असे त्यांनी सांगितले. सोमय्या निघून जाताच सोमय्या आले त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडून शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं. ग्रामपंचायतीचं शुद्धीकरण केल्याचं सरपंचांनीही सांगितलं.
यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, “सरपंच म्हणतात बंगले अस्तित्वात नाहीत. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. मग नेमकं खरं काय? हे जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो. यासंपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. चर्चा एकदम व्यवस्थित झाली आहे. शिवसैनिक जमले होते. पण पुण्यासारखा प्रसंग इथं घडलेला नाही”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, अलिबागच्या कोर्लई गावातील रश्मी उद्धव ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले दाखवा, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना दिलं होतं. सोमय्यांनी बंगले दाखवल्यास मी राजकारण सोडेन. पण त्यांना बंगले दाखवता आले नाहीत, तर मी त्यांना चपलेनं मारेन, असा स्पष्ट इशाराच राऊत यांनी दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
‘मातोश्री’वरील चौघांसाठी ईडी नोटीस तयार; नारायण राणेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
सुखी संसार चालू असताना अचानक झाला पतीचा मृत्यु, मग पत्नीच्या आयुष्याला आले वेगळे वळण
हत्या करुन सुप्रियाला सोफ्यात डांबणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी शोधले, एका चपलेवरुन झाला उलगडा
सुखी संसार चालू असताना अचानक झाला पतीचा मृत्यु, मग पत्नीच्या आयुष्याला आले वेगळे वळण