Share

सामना जिंकल्यानंतरही विराटवर भडकला रोहित? राग झाला अनावर, वाचा नेमकं काय घडलं..

नुकत्याच झालेल्या टी-20 च्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा भारताने पराभव केला. भारताने 6 विकेट्सने त्यांचा पराभव केल्यामुळे, आता सामना जिंकून टीम इंडियाने टी-20सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. असे असताना सुध्दा कर्णधार रोहित शर्मा काही खुश दिसला नाही. त्याने सामना जिंकून देखील खेळाडूंवर राग काढला. त्याच्या रागामागे विराट कोहलीचे नाव जोडले जात आहे, मात्र अद्याप त्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

सामना जिंकल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही खेळाडूचं नाव न घेता म्हणाला, ‘आम्ही सामना थोडा लवकर संपवू शकलो असतो. मात्र आम्ही तसं केलं नाही. तरीही या विजयाने आम्ही खूश आहोत. यामुळे पूर्ण टीमला आत्मविश्वास मिळाला आहे. फलंदाजांनी त्यांच्यात थोडी सुधारणा करणं गरजेचं आहे.’

दरम्यान, वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 158 रन्सचं लक्ष मिळालं होतं. सहजरित्या गाठता येणारं हे लक्ष टीम इंडियाला पूर्ण करण्यात अडचणी आल्या. यावेळी काही खेळाडूंमुळे हातातला सामना गमावण्याची भीती व्यक्त केली जात होती.

वेस्ट इंडिजचं लक्ष गाठताना विराट कोहलीने 17 रन्स केले. तर त्यापाठोपाठ ऋषभ पंतही 8 रन्स करून माघारी परतला. या दोन्ही खेळाडूंमुळे भारत हा सामना सामना हरण्याची शक्यता वाटत होती. मात्र, या सामन्यात वेस्ट इंडिजचा भारताने 6 विकेट्सने पराभव केला.

रोहित शर्माचा मागील सामन्यात देखील जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला होता.  वेस्ट इंडिजच्या डावातील 45 व्या षटकात रोहितने चेंडू वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवला होता. त्यावेळी युजवेंद्र चहल मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. रोहित चहलला लाँग ऑफवर परत जाण्यास सांगत होता पण त्याने आळशीपणा दाखवला ज्यामुळे रोहितला राग अनावर झाला आणि त्याने चहलला मैदानावरच खडसावले.

चहल आरामात धावून फिल्डिंग पोझिशनवर गेल्याने चिडलेल्या त्याने चहलला ओरडले आणि धावायला सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित चहलवर ओरडताना स्पष्टपणे ऐकू येत आहे. रोहितने चहलला ओरडून परत जाण्यास सांगितले. रोहितने चहलला फटकारले आणि म्हणाला, “परत जा, तू पळून का जात नाहीस? चल तिकडे पळत जा.” यानंतर चहल फिल्डिंगच्या ठिकाणी गेला. रोहितचा असा रौद्र रूपात पहिल्यांदाच मैदानावर पाहायला मिळाले.

खेळ

Join WhatsApp

Join Now