बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडिल रवी टंडन (Raveena Tandon Father) यांचे नुकतीच काही दिवसांपूर्वी निधन झाले. ११ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळातील आजारांमुळे त्यांचे निधन झाले होते. रवीना आणि तिचे कुटुंबीय सध्या कठिण काळातून जात आहेत. यादरम्यान गुरुवारी रवीनाच्या दिवंगत वडिलांची ८७ वी जयंती होती. यानिमित्ताने रवीना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत भावूक झालेली पाहायला मिळाली.
रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर वडिलांसोबतचे काही जुने फोटो शेअर केले होते. या फोटोंसोबत तिने एक भावूक पोस्टसुद्धा लिहिली. फोटो शेअर करत रवीनाने लिहिले की, ‘हॅप्पी बर्थडे पापा. माझे आयुष्य आता पूर्वीप्रमाणे अजिबात राहणार नाही. तुम्ही नेहमी माझ्या चीयर्स. रवीनाने शेअर केलेले हे फोटो मागील वर्षी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसादरम्यानचे आहेत.
रवीनाने ११ फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली होती. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे काही फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘तुम्ही नेहमी माझ्यासोबत चालणार. मी नेहमी तुमच्यासोबत असणार. मी तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही. लव्ह यू पापा’. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कमेंट करत रवी टंडन यांना श्रद्धांजली वाहिली होती.
रवीना तिच्या वडिलांच्या खूपच जवळ होती. वडिलांच्या जाण्याने ती खूपच कोलमडून गेली होती. आपल्यावर कोसळलेल्या दुःखानंतरही तिने मुलगी म्हणून तिची जबाबदारी पार पाडली. केवळ मुलाद्वारेच अंत्यसंस्कार करण्याची प्रथा मोडून काडत तिने वडिलांवर अंत्यंस्कार केले. साश्रूनयनांनी वडिलांना मुखाग्नी देत तिने त्यांना अखेरचा निरोप दिला.
दरम्यान, रवीना टंडनचे वडील रवी टंडन बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा होते. ते एक निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते. त्यांनी ‘नजराना’, ‘अनहोनी’, ‘खेल खेल में’, ‘जिंदगी’, ‘खुद-दार’, ‘मजबूर’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रवी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक दिग्गजांसोबत काम केले.
महत्त्वाच्या बातम्या :
हिजाब वादाला द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडणाऱ्या स्वरा भास्करवर नेटकरी संतापले, म्हणाले..
अशोक सराफ यांनी अनेक वर्षांपासून जिवापेक्षा जास्त जपली आहे ‘ही’ भाग्यशाली गोष्ट
अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेला रिलीज होणार आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’