मनोरंजन विश्वात ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतसोबत दररोज काही ना काही घडते, ज्यामुळे ती चर्चेत येते. सध्या ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर तिने तिच्या पतीपासून वेगळे होण्याची चाहत्यांना दिलेली माहिती. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राखी सावंत ने तिच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे आणि ती लोकांची आवडती बनली आहे. पण वैयक्तिक जीवनातील तिचा संघर्ष नेहमीच वेगळ्या पातळीवर राहिला आहे. राखी सावंतने जेव्हा तिच्या लग्नाची बातमी सांगितली तेव्हा तिचे रितेशसोबतचे नाते खूपच गूढ होते. राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सस्पेन्स निर्माण करून आणखीनच रहस्यमय बनवले होते.
पण बिग बॉस 15 मध्ये पहिल्यांदाच राखीचा पती रितेश लोकांसमोर आला. पण आता हे नातेही संपुष्टात आले आहे. राखी सावंतने ही माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने पती रितेशसोबतच्या ब्रेकअपची बातमी शेअर केली आहे.
राखी सावंतने यात लिहिले की, प्रिय मित्र आणि शुभचिंतकांनो, रितेश आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस शो नंतर बरेच काही घडले आणि मी अशा अनेक गोष्टींचा सामना केला ज्यावर माझे नियंत्रण नव्हते. आम्ही गोष्टी दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही झाले नाही.
तसेच म्हणाली, आपण कायमचे वेगळे व्हावे आणि वेगळे आयुष्य जगावे हेच आम्हा दोघांसाठी चांगले होते. मला हे सगळं व्हॅलेंटाईनडेच्या अगोदर तुम्हांला सांगायचं आहे, हे विचार करून मला खूप विचित्र वाटत होतं. माझे हृदय तुटले आहे. पण निर्णय घेणे आवश्यक होते.
मी रितेशला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते शिवाय, मला आता माझ्या पुढील करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात वेळ द्यायचा आहे. मला आनंदी जीवन जगायचे आहे. मला समजून घेतल्याबद्दल आणि समर्थन केल्याबद्दल धन्यवाद. असे ती म्हणाली.