उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाजार नियामक सेबीने अनिल अंबानी, त्यांचे तीन सहकारी आणि रिलायन्स होम फायनान्स यांना बाजारातून बंदी घातली आहे. सेबीने शुक्रवारी ही कारवाई केली असून, त्यात त्यांना तीन महिन्यांसाठी बाजारातून बंदी घालण्यात आली आहे.(anil-ambani-do-that-he-was-banned-by-the-stock-market)
SEBI ने ही बंदी कंपनीच्या निधीचा गैरवापर आणि कर्ज फेडण्यासाठी समूहाच्या इतर घटकांकडे हस्तांतरित केल्याबद्दल घातली आहे. अंबानींसोबत बंदी घालण्यात आलेल्यांमध्ये अमित बापना, रवींद्र सुधाकर(Ravindra Sudhakar) आणि पिंकेश आर शाह यांचा समावेश आहे. या लोकांवर कंपनीत कथित फसवणुकीचा आरोपही आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘सेबीकडे नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थाशी, कोणतीही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी किंवा कोणत्याही सार्वजनिक कंपनीचे कार्यवाहक संचालक/प्रवर्तक, ज्यांना भांडवल उभारायचे आहे, त्यांच्याशी संलग्न होण्यास संस्थांना मनाई आहे.
रिलायन्स होम फायनान्सने किमान 13 संस्थांना निधी हस्तांतरित केल्याचे सेबीच्या तपासणीत आढळून आले. या संस्थांमध्ये Citi Securities and Financial Services आणि Tulip Advisors यांचाही समावेश आहे. हा निधी जनरल पर्पज कॉर्पोरेट लोन (GCPL) स्वरूपात देण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स होम फायनान्सच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. कंपनीचा शेअर 5 रुपयांपेक्षा कमी झाला आहे. शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर शेअर 1.40 टक्क्यांनी घसरून 4.93 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. या स्टॉकची 52 आठवड्यांची किमान किंमत 2.05 रुपये आहे. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल 238.89 कोटी रुपये होते. सेबीची बंदी या कंपनीच्या भागधारकांसाठीही चिंतेचा विषय आहे.