Share

अरुण गवळीच्या दारूच्या अड्ड्यावर माझे वडील करायचे ‘हे’ काम, जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा

jitendra awhad

रविवारी ठाणे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच त्यांचे वडील आणि आजोबांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. धारावीत माझ्या वडिलांनी काही काळ हमाली केली. मात्र त्यांनी कधी लाज बाळगली नाही. पण माझा बाप गावी गेला नाही, असे आव्हाड यांनी सांगितले. (jitendra awhad talked about his fathers struggle)

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, ‘घरच्यांना मदत व्हावी म्हणून माझे बाबा अरूण गवळी (Arun Gawli) यांच्या वडिलांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करायचे. दुसऱ्यांना पैसे मोजायला देण्यापेक्षा या लहान मुलाला पैसे मोजायला सांगितले तर गल्ला कितीचा होतो, हे समजेल, असे अरुण गवळी यांच्या वडिलांना वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी माझ्या वडिलांना पैसे मोजण्याच्या कामावर ठेवले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.

‘मी ज्ञानात कमी नाही. भाषेत कमी नाही अन् कशातच कमी नाही. मी जसा आहे तशीच धमक तुमच्यातही असली पाहिजे. तुमची सर्वांना धडकी भरली पाहिजे, असं सांगतानाच शरद पवार यांच्यामुलेच माझं नशिब फळफळलं. मी इथवर येऊ शकलो, असंही आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तसेच यावेळी पुढे बोलताना आव्हाड यांनी पुन्हा एकदा ओबीसींची राजकीय इच्छा शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जर एक झालो नाही, आपली जर ताकद राजकारण्यांना कळली नाही तर ते आपल्याला गृहित धरतील. कुणीही ओबीसींना गृहित धरता कामा नये त्यासाठी एक व्हा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

आपल्याकडे 354 जाती आहेत. अनेक जातीचे लोक आले आहेत. मी स्वतःच ओबीसी आहे. मी राजकारण केले नाही. पण आपल्या बांधवांसाठी मला लढावे लागणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. बिहारमधील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो तर महाराष्ट्रातील ओबीसी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही? असा सवाल आव्हाड यांनी केला.

दरम्यान, शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसीच होते. पण, हा लढणारा ओबीसी आता शांत आहे. त्यामुळेच ‘त्या’ लोकांना असे वाटते की या ओबीसींनाच जात नकोय, पण, आता शांतपणे पाहण्याची वेळ गेली आहे. शिक्षणातील आरक्षण संपणार असल्यानेच माझा जीव तुटतोय म्हणून आता मंडल आयोगाची दुसरी लढाई सुरु करावीच लागेल, असे आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवं’ असे म्हणत प्राजक्ता माळीने सरकारकडे केली ‘ही’ विनंती
काँग्रेस नेता बरळला; हिजाब परिधान न केल्यास महिलांवर बलात्कार होतो
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या जोडप्यांना शिवसेनेचा इशारा; म्हणाले, गार्डनमध्ये शोना-बाबू करताना दिसला, तर…
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला IPL ऑक्शनमध्येही नाही मिळाला भाव, बेस प्राईजवरच विकला गेला

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now