Share

काँग्रेस नेता बरळला; हिजाब परिधान न केल्यास महिलांवर बलात्कार होतो

congress

कर्नाटकमध्ये हिजाबवरून (Karnataka Hijab Row) वाद चांगलाच चिघळला आहे. मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. हिजाब वादामुळे देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी त्याचे पडसाद आंदोलन केली जात आहेत. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. (women get raped when they dont wear hijab)

उडप्पी जिल्ह्यातील कुंदापूर येथील हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्या पासून या वादाला तोंड फुटले. त्याचसोबत त्यांना भगवी शाल अंगावर ओदुन काही लोकांनी त्रास दिला. यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अशातच आता कॉंग्रेस नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानाने या प्रकणाला वेगळे वळण लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलांनी हिजाब परिधान न केल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो, असं वादग्रस्त विधान कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी केलं आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जमीर अहमद म्हणाले, ‘इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. हिजाबमुळे महिलांचे सौंदर्य दिसत नाही. तसेच महिलांनी हिजाब परिधान न केल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो.

दरम्यान, कर्नाटकमध्ये उडपीमधील एका महाविद्यालयात सहा विद्यार्थिनींना हिजाब घातला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्या विद्यार्थिनींना शिक्षणा विभागात तक्रार केली. पण, मुलींनी महाविद्यालयीन गणवेशातच यावं, असं सांगण्यात आलं. त्यानंतर मुलींनी न्यायालयात धाव घेतली.

तसेच “आमच्या इथे काही पुरुष शिक्षक आहेत. आम्हाला पुरुषांसमोर आमचे केस झाकावे लागतात. त्यामुळं आम्ही हिजाब परिधान करतो,” असं अल्मास एएच या विद्यार्थिनीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, या वादाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात देखील पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे भाजप नेत्याला गमवावा लागला जीव; १ कोटीसाठी पत्नीने…
दोन्ही लेकरांना वडापाव खाऊ घातला अन् मुलांसह बापाने घेतली रेल्वेखाली उडी, जळगावातील भयानक घटना
मुंबई इंडियन्सची मोठी खेळी! जो खेळाडू म्हणाला, मी IPL नाही खेळणार, त्यालाच घेतले ८ कोटींना विकत
असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, एकदिवस हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान बनेल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now