बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘गेहराइयां’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे. ११ फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही जण चित्रपटाचे कौतुक करत आहेत तर काही जण यामध्ये दाखवण्यात आलेल्या नात्याबद्दल टीका करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री कंगना राणावतनेही चित्रपटाबाबत समीक्षण (Kangana Ranaut About Gehraiyaan) करत चित्रपटाची तुलना पोर्नोग्राफीशी केली आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करत ‘गेहराइयां’ चित्रपटाबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये तिने मनोज कुमार यांच्या ‘चांद सी महबूबा’ हे गाणं शेअर करत लिहिले की, ‘मीसुद्धा याच पिढीची आहे. पण मी याप्रकारच्या रोमान्सला समजते. पीढी/ नवं युग/ शहरी चित्रपटांच्या नावावर कचरा विकू नका. वाईट चित्रपट वाईट चित्रपटच असतात. कोणताही चित्रपट कितीही स्किन शो किंवा पोर्नोग्राफी दाखवू दे त्याला ते वाचवू शकत नाही. हे एक महत्त्वाचे तथ्य आहे की, कोणतीही ‘गहराइयां’सारखी गोष्ट नाही’.
नुकतीच स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून सांगणाऱ्या कमाल आर खाननेही ‘गेहराइयां’ चित्रपटाचे समीक्षण करताना हा चित्रपट म्हणजे सॉफ्ट पॉर्न असल्याचे म्हटले होते. यासोबतच त्याने एकामागून एक ट्विट करत दीपिकासोबत करण जोहर आणि सिद्धांत चतुर्वेदीवरही असभ्य टिप्पणी केली. त्याच्या या समीक्षणाचीही फारच चर्चा झाली.
दूसरीकडे दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंह मात्र ‘गेहराइयां’ या चित्रपटामुळे फारच खुश आहे. इन्स्टाग्रामवर त्याने समुद्रकिनारी दीपिकासोबत लिपलॉक करतानाचा एक फोटो शेअर करत चित्रपटातील तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले.
रणवीरने लिहिले की, ‘डुबे..हां डूबे..एक दुजे में यहां.. श्रेष्ठ, उत्तम, उत्कृष्ट. काय मास्टरक्लास परफॉर्मन्स आहे बेबी. खूपच दमदार, परिपूर्ण आणि मनाला भिडणारी कलात्मकता. तुझा अतुलनीय आणि सर्वोत्तम अभिनय. मला तुझा अभिमान आहे’.
https://www.instagram.com/p/CZ1m3zbBc4i/
दरम्यान, ‘गेहराइयां’ या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कथानक या चार कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
पाँडिचेरी: स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी चित्रपट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
PHOTO: ड्रग्स प्रकरणी जेलमधून सुटल्यानंतर पहिल्यांदाच IPL लिलावात दिसला आर्यन; सुहानाही होती सोबत
KRK ने उडवली ‘गेहराइयां’ चित्रपटाची खिल्ली; दीपिकाला म्हणाला, सेक्सची मल्लिका, तर सिद्धांतला म्हणाला..