भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये तो त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी सफा बेग दिसत आहे. विमानतळावर काढलेला हा फोटो आहे.(Irfan Pathan trolled by netizens for posting photos)
या फोटोमध्ये सफाने हिजाब घातला आहे. याचमुळे लोक इरफान पठाणला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये इरफान पठाणने लिहिले आहे की, त्याचा मुलगा हा पहिल्यांदाच हवाई प्रवास करत होता.
इरफानने आत्ता सफाचा बुरखा घातलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे काही यूजर्सने त्याला ट्रोल केले आहे. कर्नाटकातील एका कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून वाद सुरु आहे. या वादाची चर्चा पूर्ण देशभरात चालू आहे.
या पार्श्वभूमीवर त्याने हा फोटो शेयर केल्याचा आरोप काही युजर्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “तू खूप चांगला खेळाडू होतास, पण एक माणूस म्हणून तुझी विचारसरणी खूप रूढीवादी आहे.”
इरफान पठाणने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेयर केला होता. त्या फोटोमध्ये त्याने मुलाला खांद्यावर बसवले असून, त्याची पत्नी सफा त्याच्यासोबत उभी आहे. फोटो पाहताच समजते की, फोटो एडीट करताना सफाने मास्क घातला आहे.
इरफानच्या पत्नीच्या तोंडावर नेहमी मास्क घातलेले असते. सफाने स्वतःचा चेहरा आत्तापर्यंत कधीच दिसू दिला नाही. याबाबत ट्रोल झाल्यानंतर तिने सांगितले आहे की, बुरखा घालण्याचा निर्णय माझा स्वतःचा आहे.
महत्वाच्या बातम्या
रक्ताचं नातंही विसरला नराधम, शारीरिक संबंध ठेवून बहिणीची केली निर्घृण हत्या, कारण वाचून बसेल धक्का
दिव्याखाली अंधार! घराणेशाहीच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंनी तेजस्वी सुर्याला करून दिली काकांची आठवण