Share

पुन्हा मुळशी पॅटर्न! पुण्यात मोहोळ आणि शेलार टोळीयुद्धाचा भडका, घटना CCTV मध्ये कैद

sharad mohol

पुणे शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाने भडका उडाला आहे. गँगस्टर मोहोळे आणि मुळशीच्या शेलार टोळी आमने – सामने आल्याने पुण्यात एकच गोंधळ उडाला. हा प्रकार ८ जानेवारीला रात्री सव्वाबारा ते एक या कालावधीत घडला. या हल्लाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

शरद मोहोळच्या टोळीने विठ्ठल शेलारच्या साथीदारांवर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात शरद मोहोळसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल शेलारवर हल्ला केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच या हल्ल्याची CCTV दृश्य आहेत. पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी शरद हिरामण मोहोळ, आलोक शिवाजी भालेराव, मल्हारी मसुगडे आणि सिद्धेश्वर बाहु हगवणे अशी आरोपींची नावे आहेत. आणि यांच्यासह इतर ५-६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, व्यवसायिक वादातून शेलार याने आरोपी सिद्धेश्वर हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. याचाच राग डोक्यात घेऊन गँगस्टर शरद मोहोळ याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे गेले.

त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. त्यात बसलेल्या विठ्ठल शेलारवर आणि त्याच्या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारल्या. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे या घटनेचा तपास करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुळशीतील कुख्यात गुंड विठठ्ल शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. विठठ्ल शेलार हा उरवडे गावाजवळील बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
..तोपर्यंत धार्मिक कपडे परिधान करण्याचा आग्रह धरू नये, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी ‘या’ व्यक्तीसोबत मिळून माझ्यावर हल्ल्याचा कट रचला, सोमय्यांचा गौप्यस्फोट
जन्मदात्या आईने चिमुकल्याला साडीला बांधून दहाव्या मजल्यावर लटकवले, कारण वाचून चक्रावून जाल
आॅस्ट्रेलियाविरूद्ध मी जिंकवलं पण त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यांनी घेतलं’; अजिंक्य रहाणे का भडकला?

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now