‘कच्चा बदाम’ गाण्यावर लेकीने केलेला डान्स पाहून अल्लू अर्जून म्हणाला, माझी छोटी बदाम…

सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बदाम’ हे गाणं फारच व्हायरल होत आहे. या गाण्यावर सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण थिरकताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर दररोज या गाण्यावर अनेक रिल्स पाहायला मिळत आहेत. यादरम्यान या गाण्यावरील आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ आहे ‘पुष्पा’ फेम अभिनेता स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची लाडकी मुलगी (allu arjun daughter)अरहाचा.

अभिनेता अल्लू अर्जूनची मुलगी अरहाने ‘कच्चा बदाम’ या ट्रेंडिंग गाण्यावर रिल तयार केला आहे. तर अल्लू अर्जूनने तिचा हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, अरहाने बेबी पिंक कलरचा ड्रेस घातला असून ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर खूपच क्यूट अंदाजात डान्स करत आहे.

अरहाचा हा व्हिडिओ शेअर करत अल्लू अर्जूनने कॅप्शनमध्ये ‘माझी छोटी बदाम अरहा’ असे लिहिले आहे. अल्लू अर्जूनच्या लेकीचा हा व्हिडिओ लोकांच्या फारच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 9 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे तर २ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केला आहे. सध्या सोशल मीडियावर अरहाचा हा व्हिडिओ चर्चेत आहे.

नुकतीच काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जूनने इन्स्टाग्रामवर अरहाचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये अरहा तिच्या वडिलांचे स्वागत करताना दिसून आली. अल्लू अर्जून दुबईवरून १६ दिवसांनी घरी परतला होता. त्यामुळे अरहाने वडिलांनी सरप्राईज देण्याचे ठरवले. त्यानुसार तिने वडिलांच्या स्वागतासाठी फुलांनी सजावट केली. तर लेकीच्या या स्वागताने अल्लू अर्जूनही भारावून गेला होता.

अल्लू अर्जून सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. याद्वारे तो नेहमी त्याची मुलगी अरहा आणि मुलगा अयानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या या पोस्ट्सना चाहत्यांकडूनही नेहमी पसंती मिळत असते. तसेच त्याचे प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

दरम्यान, ‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जूनच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली आहे. दक्षिणेसोबत संपूर्ण भारतभर त्याचे चाहते वाढले आहेत. अशात त्याच्यासंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते खूपच उत्सुक आहेत. त्यामुळेच त्याच्यासंबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
जेव्हा गंगूबाई काठियावाडी यांनी जवाहरलाल नेहरूंना केले होते प्रपोज, वाचा पुर्ण किस्सा
२७ वर्षांपासून लतादीदींची सेवा करत होते महेश राठोड, आता त्यांच्या जाण्याने झालेत अस्वस्थ
एकाच मंडपात दिसले पवनदीप आणि अरुणिता, लग्नाचे फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न