Share

PHOTO: लेक चालली सासरला! लेकीला निरोप देताना भावूक झाल्या अलका कुबल, म्हणाल्या..

Alka Kubal Gets Emotional

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. ईशानीने दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अलका कुबल यांनी लेकीच्या लग्नसोहळ्यादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अलका कुबल भावूक झालेल्या (Alka Kubal Gets Emotional During Daughter’s Wedding) दिसून येत आहेत.

अलका कुबल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो मुलगी ईशानी सासरी जातानाचा आहे. या फोटोत अलका यांच्या आजूबाजूला काही लोक दिसत आहेत. तसेच लेक सासरी जात असल्याने अलका कुबल भावूक झाल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहेत.

फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘भावूक क्षण…. जेव्हा लेक चालली सासरला’. यासोबत त्यांनी एक हार्टचा इमोजीसुद्धा शेअर केला आहे. अलका यांची ही पोस्ट अनेकांच्या पसंतीस उतरत असून त्यावर अनेकजण कमेंट करत आहेत. चाहत्यांसोबत त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळीसुद्धा कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अलका कुबल यांच्या मुलीच्या लग्नात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये अलका कुबल यांच्या मुलीच्या लग्नात अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती, प्राजक्ता दिघे, स्मिता जयकर, अर्चना नेवरेकर, मिलिंद गवळी, निर्मिती सावंत अशा कलाकारांचा समावेश होता.

यापूर्वीही अलका यांनी इन्स्टाग्रामवर मुलीच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले होते. त्यांच्या या फोटोंनाही चाहत्यांची फारच पसंती मिळाली होती. अलका यांना दोन मुली आहेत. ईशानी ही त्यांची मोठी मुलगी असून ती एक वैमानिक आहे. आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता तिने आपला वेगळा मार्ग निवडला. तर अलका यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव कस्तुरी असे आहे.

दरम्यान, अलका कुबल यांनी मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहेत. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्यांना फार लोकप्रियता मिळाली. तसेच मराठीत त्यांनी ‘लेक चालली सासरला’, ‘वहिनीची माया’, ‘माधवी तुझ्या वाचून करमेना’, ‘मधु चंद्राची रात्र’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ अशा अनेक चित्रपटातील आपल्या अभिनयाद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.

महत्त्वाच्या बातम्या :
जेव्हा गंगूबाई काठियावाडी यांनी जवाहरलाल नेहरूंना केले होते प्रपोज, वाचा पुर्ण किस्सा
२७ वर्षांपासून लतादीदींची सेवा करत होते महेश राठोड, आता त्यांच्या जाण्याने झालेत अस्वस्थ
वहीदा रहमान: लतादीदींनी त्या दिवशी माझ्यासाठी पाण्याच्या अनेक बादल्या भरून आणल्या, नरगिसदेखील झाली होती अवाक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now