बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार आहेत. काजल गरोदर असून लवकरच ती एका बाळाला जन्म देणार आहे. सध्या काजल दुबईत असून ती तिच्या पतीसोबत सुट्यांचा आनंत लुटत आहे. यादरम्यानचे अनेक फोटो ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत आहे. नुकतीच काजलने दुबईतील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच तिने पोस्टमध्ये तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले (Kajal Aggarwal Lashes Out at trollers) आहे.
काजलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तीन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती समुद्रकिनारी असल्याचे दिसून येत आहे. तसेच या फोटोंमध्ये काजल खूपच स्टनिंग दिसत आहे. हे फोटो शेअर करत काजलने एक मोठी पोस्टसुद्धा लिहिली. यामध्ये तिने प्रेग्नेन्सीदरम्यान महिलांच्या शरीरात होणारे बदल तसेच प्रेग्नेंन्ट महिलांवर बनवण्यात येणारे मीम्स यावर ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
पोस्टमध्ये काजलने लिहिले की, ‘मी माझ्या जीवनात, शरीरात, घर आणि सर्वात महत्त्वाचे माझ्या कामाच्या जागेत होणाऱ्या नव्या बदलांचा अनुभव घेत आहे. तसेच काही कमेंट्स किंवा बॉडी शेमिंगचे मेसेजेस किंवा मीम्स याचा मला काही फरक पडत नाही. जरा दयाळू व्हायला शिकूया आणि जर ते खूपच कठीण असेल तर निदान जगा आणि जगू द्या!’
काजल अग्रवालने तिच्या पोस्टमध्ये प्रेग्नेंन्सीदरम्यान महिलेच्या शरीरात होणाऱ्या शारीरिक परिवर्तनाबद्दलसुद्धा सांगितली आहे. तसेच या काळात होणाऱ्या बदलांबाबत कोणत्याही महिलेला चिंता करण्याची गरज नसल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काजलने लिहिले की, ‘प्रेग्नेन्सीदरम्यान आपल्या शरीरात वजन वाढण्यासह इतरही अनेक बदल होतात. पोटात जसजसे बाळाची वाढ होत जाते त्यानुसार हार्मोनल बदलांमुळे शरीरात हे बदल होत असतात’.
‘काहींचे वजन वाढल्यामुळे त्यांना स्ट्रेच मार्क्ससुद्धा येऊ शकतात. तर काहींच्या त्वचेवर मुरूम फुटतात. या काळात नेहमीपेक्षा आपण अधिक जास्त थकलेले असू शकतो आणि आपला मूड नेहमी बदलत असतो. अशा वेळी नकारात्मक मनःस्थितीमुळे आपल्या शरीराबद्दल अस्वस्थता वाटू शकते किंवा नकारात्मक विचार येण्याची अधिक शक्यता असते’.
काजोलने पुढे प्रसूतीनंतर होणाऱ्या बदलांबाबतही सांगताना याबाबत अधिक चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तिने लिहिले की, ‘बाळाला जन्म दिल्यानंतर आपण पूर्वीप्रमाणे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. किंवा आपण प्रेग्नेन्सीच्या पूर्वी कसे दिसायचो त्यासारखे कधीच दिसूही शकणार नाही. पण ठीक आहे ना. त्याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही’.
‘हे बदल नैसर्गिक आहेत. आणि आपण जेव्हा आपल्या जीवनातील नवीन आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी तयार असताना (विशेषत: आपल्या लहान बाळाच्या आगमनाची अपेक्षा करताना) आपल्याला असामान्य वाटून घेण्याची गरज नाही. आपण स्वतःला एका साचेत बांधून ठेवण्याची गरज नाही. आपल्या जीवनातील सर्वात सुंदर, चमत्कारी आणि मौल्यवान अशा टप्प्यातून जात असताना आपल्याला अस्वस्थ किंवा दबावाखाली राहण्याची अजिबात आवश्यकता नाही’.
‘आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, एका बाळाला जन्म देण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक उत्सव आहे. आणि तो बदल अनुभवण्याचा आपल्याला विशेष अधिकार आहे. दरम्यान, काजलने तिच्या या पोस्टद्वारे तिच्यासोबत इतरही महिला ज्या या प्रसंगातून जात आहेत त्यांना नक्कीच मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
वहीदा रहमान: लतादीदींनी त्या दिवशी माझ्यासाठी पाण्याच्या अनेक बादल्या भरून आणल्या, नरगिसदेखील झाली होती अवाक
२७ वर्षांपासून लतादीदींची सेवा करत होते महेश राठोड, आता त्यांच्या जाण्याने झालेत अस्वस्थ
..जेव्हा लतादीदींनी शाहरूखबद्दल सांगितली होती ‘ही’ गोष्ट, शाहरूखच्या ट्रोलर्सनी हे नक्कीच वाचलं पाहिजे