Share

जॉन्सनच्या बेबी पावडरवर जगभरात येऊ शकते बंदी; यामागील कारण ऐकून बसेल धक्का…

ब्रिटनमधील आघाडीची आरोग्य सेवा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या विक्रीवर जगभरात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. याआधी 2020 मध्येच अमेरिका आणि कॅनडामध्ये याची विक्री थांबली आहे. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक सापडल्याचा दावा अमेरिकन नियामकांनी केला आहे.

बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत असणारे घटक आढळल्याच्या दाव्याने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी अडचणी येऊ शकते. जॉन्सन अँड जॉन्सनने याआधी 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडर विक्री थांबवली होती. अमेरिका नियामकांनी दावा केला आहे की, त्यांना कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक सापडले आहेत. तेव्हापासून कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे.

अमेरिका नियामकांच्या मते, पावडरमध्ये कार्सिनोजेनिक क्रायसोटाइल फायबर आढळले आहेत. हा एक प्रकारचा एस्बेस्टोस आहे ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. द गार्डियनच्या अहवालानुसार, कंपनीविरोधात 34,000 हून अधिक खटले सुरू आहेत. यापैकी अनेक केसेस महिलांनी दाखल केल्या आहेत. त्यांनी तक्रार केली की, कंपनीची बेबी पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाला.

टॅल्क हे जगातील सर्वात मऊ खनिज आहे, जे अनेक देशांमध्ये उत्खनन केले जाते. कागद, प्लास्टिक आणि फार्मास्युटिकल्स इत्यादींसह अनेक उद्योगांमध्ये याचा वापर केला जातो. अंगावर उष्णतेने येणारे पुरळ आणि इतर वैयक्तिक स्वच्छतेसाठी टॅल्कचा वापर केला जातो.

मात्र, हेच आरोग्यदायी टॅल्क कधीकधी एस्बेस्टोसने दूषित होऊ शकते. एस्बेस्टोस हे एक खनिज आहे ज्याचे फायबर शरीरात घेतल्यास कर्करोग होऊ शकतो. तर दुसरीकडे, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपली बेबी पावडर हानिकारक असल्याचे नाकारले आहे.

कंपनीने सांगितले की, उत्तर अमेरिकेतील विक्री घटल्यामुळे त्याने त्या ठिकाणच्या विक्रीवर बंदी आणली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, उत्पादनाबद्दल पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे त्याच्या विक्रीत अजूनच घट झाली. एका प्रवक्त्याने 2020 कोहोर्ट स्टडीचा हवाला देत म्हटले आहे की टॅल्क वापरामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो, याबद्दल कोणताही ठोस पुरावा अजून मिळाला नाही.

इतर आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now