VIDEO: आकाश ठोसरसोबत डेटच्या चर्चांनंतर रिंकूने पोस्ट केले खास reel, चाहते झाले घायाळ

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या चांगलीच चर्चेत येत आहे. तिचे चर्चेत येण्याचे कारण ठरत आहे तिने शेअर केलेल्या तिच्या वेगवेगळ्या पोस्ट. तिने नुकतेच तिचे साडीतील कातीलाना अदां देत फोटो शेअर केल्यामुळे रिंकू राजगुरू कोणाच्या प्रेमात पडली आहे का ? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

रिंकू राजगुरूनं केवळ मराठीत नाही तर हिंदीतही आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. ‘सैराट’ सिनेमातील आर्ची अजूनही चाहत्यांच्या डोळ्यांसमोरून जात नाही. वयाच्या पंधराव्या वर्षात कोणत्याही ट्रेनिंगशिवाय तिनं साकारलेली भूमिका काही केल्या तिच्या चाहत्यांच्या मनातून पुसली जात नाही. म्हणूनच तर ती आजही आर्ची नावाने जास्त ओळखली जाते.

सध्या तीने तिचे साडीमधील कातीलाना अदा देत फोटो शेअर केले आहेत. रिंकूने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे रिंकूचं नेमकं चाललंय तरी काय?ती कोणाच्या प्रेमात पडली का? असे अनेक सवाल तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

या व्हिडिओ मध्ये रिंकू निळ्या रंगांची साडी घालून उभी आहे. तिने केसाचा अंबाडा बांधला आहे. केसात तिने गजरा माळला आहे. आपल्या गजऱ्याला हात लावून ती पोझ देत आहे. यावेळी 1968 मधील किस्मत या चित्रपटातील ‘ कजरा मोहब्बत वाला…’ हे गाणे सुरू आहे. तिने या गाण्यावर अदां दिली आहे. सोबतच old songs are just my mood and heart असे तिने कॅप्शन मध्ये टाकले आहे.

तसेच तिने या साडीवर व्हिडिओ सोबतच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आणि लाईक्स येत आहेत. तिच्या या फोटोमुळे ती कोणाच्या तरी प्रेमात तर पडली नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नुकतीच रिंकूने अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबत डिनर डेट केली होती. त्या संदर्भातील पोस्ट तिने शेअर केली होती. त्यांचे डिनर डेटचे फोटो पाहून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. चाहत्यांनी यावर खूप छान जोडी म्हणत कमेंट्स केल्या होत्या. पण या दोघांनी मात्र यावर शांत राहणं पसंत केलं आहे.