Share

आईच्या आठवणीत भावूक झाला अर्जुन कपूर; म्हणाला, ‘मी तुझ्याशिवाय अपुर्ण आहे, लव्ह यू’

arjun kapoor mother birth anniversary

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी खूप जवळीकता आहे. मात्र, तो सर्वांपेक्षा आपल्या आईच्या खूपच जवळ होता. मात्र, अर्जुनच्या आईचे १० वर्षापूर्वी निधन झाले. दरम्यान, गुरुवारी (३ फेब्रुवारी) अर्जूनच्या आईचे वाढदिवस (arjun kapoor mother birth anniversary) होते. त्यामुळे आईच्या आठवणीत अर्जुन भावूक झालेला दिसला. सोशल मीडियावर त्याने आईची आठवण काढत एक भावूक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने आईला खूप मिस करत असल्याचे म्हटले.

अर्जूनने आईच्या वाढदिवशी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर आईचा एक फोटो शेअर केला होता. यासोबत त्याने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माँ. माझ्या फोनवर तुझे नाव दिसणे मी मिस करत आहे. घरी येऊन तुझ्याजवळ बसणे मिस करत आहे. तुझ्यासोबत आणि अंशुसोबत खूप साऱ्या गोष्टी बोलत बसणे मिस करत आहे. मला तुझी खूप आठवण येत आहे माँ’.

अर्जूनने पुढे लिहिले की, ‘तुझे नाव घेणे मिस करत आहे, तुझा गंध मिस करत आहे, तुझ्यासमोर लहान मुलाप्रमाणे वागणे, तुझ्यासोबत हसणे सर्व काही मिस करत आहे. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे माँ. मला आशा आहे की, तू जर आम्हाला पाहत असशील तर माझ्या या स्वभावाचा तुला अजूनही अभिमान वाटत असेल. लव्ह यू . तुझाच प्रामाणिक गुबगुबीत गालांचा मुलगा’.

https://www.instagram.com/p/CZfERkarrK7/

दुसरीकडे, अर्जूनची बहिण अंशुला कपूरनेही आईच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. मला माझी आई पाहिजे, या भावनेला वास्तवात कोणत्याही वयाची सीमा नसते. तसेच दुःखालाही कोणत्याही वेळेची सीमा नसते. १० वर्ष झाले आहेत. पण केवळ ठीक आहोत असे वाटण्यासाठी खूप मेहनत करावी लागते’.

अंशुलाने पुढे भाऊ अर्जून कपूरची प्रशंसा करत लिहिले की, ‘माँ, मला आशा आहे की तु जिथे कुठे असशील तेथून आम्हाला पाहत आहेस आणि तुला माझा आणि अर्जून कपूरचा अभिमान वाटत असेल. मला प्रत्येक दिवशी त्याचा अभिमान वाटत असतो. आजच्या दिवसासारखे जेव्हा कधी माझे काळीज तुटते तेव्हा अर्जून माझ्याजवळ आहे या भावनेने माझ्या ह्रदयावरील जखमा लवकर भरून निघतात. लव्ह यू. तु माझ्या काळजाचा मौल्यवान तुकडा आहेस’.

दरम्यान, अर्जून कपूर आणि अंशुला कपूर यांची आई मोना कपूर या बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. श्रीदेवी यांच्यासोबत जवळीकता वाढल्यानंतर बोनी कपूर मोना यांच्यापासून वेगळे झाले. १९९६ मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचे कॅन्सरने निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या :
‘भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण?’
सलमान खानमुळे ‘Valentine Day’ला कतरिना होणार विकी कौशलपासून लांब; ‘हे’ आहे कारण
‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल शिदमला ३० मुलांनी दिलाय लग्नासाठी नकार, कारण वाचून अवाक व्हाल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now