Share

आधी विद्यार्थ्यासोबत ठेवले शारिरीक संबंध नंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी केले लग्न, वाचून अवाक व्हाल

जगात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी विद्यार्थी-शिक्षक नातेसंबंध लाजिरवाणे करून टाकले आहे. असेच एक प्रकरण अमेरिकेतही समोर आले आहे, जिथे एका महिला शिक्षिकेने तिच्याच विद्यार्थ्यासोबत तिच्या घरी शारीरिक संबंध केले, पण नंतर महिला शिक्षिकेने शिक्षेपासून वाचण्यासाठी जी पाऊले उचलली, त्यावरही सवाल उपस्थित केला जात आहे.(The female teacher’s relationship with the student)

वकिलांनी महिला शिक्षिकेविरुद्ध सुरू असलेला लैंगिक अत्याचाराचा खटला मागे घेतला. महिला शिक्षिकेवर तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप होता. मात्र, आता त्याच विद्यार्थ्यासोबत लग्न केल्याने महिला शिक्षिकेवरील लैंगिक छळाचा गुन्हा मागे घेण्यात आला आहे.

खर तर हे प्रकरण अमेरिकेतील मिसूरी येथील आहे. जिथे 26 वर्षीय हायस्कूल महिला शिक्षिका बेली टर्नरवर एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. बेली टर्नरने पोलिसांसमोर कबुल केले की जानेवारी 2019 मध्ये तिचे तिच्या घरी एका विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध होते.

ही बाब उघडकीस आल्यानंतर बेली टर्नरला अटक करून खटला चालवण्यात आला. फेब्रुवारी 2019 मध्ये अटक झाल्यानंतर बेलीने सरकोक्सी हायस्कूलमधून राजीनामा दिला. तिला आपला शिकवण्याचा परवानाही सरेंडर करावा लागला.

मात्र, आता बेली टर्नरविरुद्ध सुरू असलेला लैंगिक अत्याचाराचा खटला सरकारी वकिलांनी फेटाळून लावला आहे. अहवालानुसार, बेलीने नुकतेच ‘पीडित’ विद्यार्थ्यासोबत लग्न केल्यानंतर सरकारी वकिलांनी बेलीवरील लैंगिक अत्याचाराचा खटला मागे घेतला आहे. द जोप्लिन ग्लोबच्या अहवालानुसार, शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत केलेल्या लग्नाच्या परिणामी, फिर्यादींनी बेली टर्नरविरुद्धचे आरोप पत्नीच्या विशेषाधिकारातून फेटाळून लावले.

या खटल्यातील सहाय्यक अभियोक्ता नेट डेली यांनी सांगितले की, टर्नरवर खटला चालवण्यास सरकारी वकिलांना अडचण आली असती. मात्र, दोघांनी (शिक्षक-विद्यार्थी) केव्हा लग्न गाठ बांधली हे स्पष्ट झालेले नाही. न्यायालयाच्या कागदपत्रांमध्येही विद्यार्थ्याच्या वयाचा उल्लेख नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमचे हात शिख आणि काश्मिरी लोकांच्या रक्ताने रंगले आहेत; राहुल गांधींच्या
त्या ट्विटवर फिल्ममेकर भडकले
लग्नात वधूला मिळाले असे गिफ्ट की पाहून सगळेच झाले अवाक, व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल
अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाले, मी राजीनामा दिला कारण…
दारूड्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला होता बलात्कार, न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

क्राईम

Join WhatsApp

Join Now