‘परदेस’ चित्रपटाद्वारे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाद्वारे आणि आपल्या सौंदऱ्याने तिने आपला एक चाहता वर्ग निर्माण केला होता. मात्र, काही काळानंतर महिमा अभिनयापासून दूर गेली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिच्यासोबत अशी एक घटना घडली ज्यामुळे तिचे करिअरच उद्ध्वस्त झाले (mahima chaudhary career ruined by one accident) होते. या घटनेबाबत महिमाने स्वतः एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला होता.
महिमा चौधरीसोबत १९९९ साली आलेल्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटादरम्यान एक घटना घडली होती. या घटनेमुळे महिमा अभिनयापासून दूर गेली. ‘दिल क्या करे’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महिमाचे अपघात झाले होते. तिची गाडी एका ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात महिमा खूपच जखमी झाली होती. तसेच तिच्या चेहऱ्यात ६७ काचा रूतले होते.
याबद्दल बोलताना महिमाने सांगितले की, ‘मला वाटले होते की, एवढ्या मोठ्या अपघातानंतर आता मी जिवंत राहणार नाही. पण सुदैवाने मी वाचले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून माझ्या चेहऱ्यात रूतलेले ६७ काचा काढले होते. त्यानंतर माझ्या चेहऱ्याची सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतर मी जिवंत तर राहिले पण माझा चेहरा आरशात पाहून मी खूपच घाबरले होते’.
महिमाने पुढे सांगितले की, ‘सर्जरीनंतर मला बाहेर जाण्यास मनाई होती. त्यामुळे मी स्वतःला घरातच कैद करून घेतले होते. तसेच मी ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. कारण मला भीती होती की, मला कोणी पाठिंबा देणार नाही. माझ्याकडे अनेक ऑफर्स होते. याबाबतही मला चिंता वाटायची’.
‘मला वाटायचे की, जर मी माझ्या अपघाताबाबत कोणाला सांगितले तर लोक म्हणणार की, हिचा चेहरा खराब झाला आहे. तेव्हा आता हिला चित्रपटात काम कोण देणार? याच भीतीने मी काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी माझी साथ दिली’, असे महिमाने सांगितले.
दरम्यान, महिमाने तिच्या करिअरमध्ये ‘दाग’, ‘धडकन’, ‘कुरुक्षेत्र’, ‘दिल है तुम्हारा’ यासारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००६ साली तिने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. परंतु, त्या दोघांचा लग्न फार काळ टिकला नाही. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. महिमा आता अभिनयात सक्रिय नसली तरी सोशल मीडियाद्वारे नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. याद्वारे ती नेहमी तिचे अनेक फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. चाहत्यांकडूनही तिच्या या पोस्ट्सना फार पसंती दिली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; लग्नाबाबत विचारल्यावर म्हणाले..
करीना कपूरने ट्विंकल खन्नासमोर केला मोठा खुलासा, म्हणाली, अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्यासोबत..
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राच्या नात्यावर कुटुंबीयांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच..