नुकताच टी -20 टीमच्या कॅप्टन्सीवरून विराट कोहली आणि बिसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये वादळ निर्माण झालं होतं. त्यातच आता हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा नवा वाद हार्दिक पांड्या आणि निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यातील आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये हार्दिक पांडयाची ऑलराऊंडर म्ह्णून निवड झाली होती असा दावा निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केला होता. हा दावा हार्दिक पांड्याने फेटाळला आहे.
हार्दिक पांड्याने सांगितले की, त्याची टी -20वर्ल्ड कपच्या टीममध्ये ऑलराऊंडर म्ह्णून नाही तर फलंदाज म्हणून निवड झाली होती. वर्ल्ड कपमध्ये आम्ही ज्या स्थितीमध्ये होतो, त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. त्यानंतर संघाच्या पराभवाचा संपूर्ण दोष माझ्यावर टाकण्यात आला. मात्र, मला फलंदाज म्ह्णून निवडण्यात आलं होतं.
चेतन शर्मा म्हणाले होते, हार्दिक पांड्याची ऑलराऊंडर म्ह्णून टीममध्ये निवड झाली आहे, तो 4 ओव्हर टाकण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, त्यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली आणि ग्रुप स्टेजमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. यानंतर भारताच्या पराभवाचं सगळं खापर हार्दिकवर फोडण्यात आलं होतं.
हार्दिक पांड्याने बोरिया मजुमदार यांच्यासोबत झालेल्या मुलाखती मध्ये चेतन शर्मा यांच्या दाव्यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. त्याने म्हंटले की, माझी फलंदाज म्ह्णून निवड झाली असूनही, वर्ल्ड कपमध्ये आम्ही ज्या स्थितीमध्ये होतो, त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मी पहिल्या सामन्यात बॉलिंग करण्यासाठी प्रयत्न केले होते, पण असं करू शकलो नाही. दुसऱ्या सामन्यात मी बॉलिंग केली, पण मी नव्हती करायला पाहिजे.
दरम्यान, हार्दिक पांड्याने एका मुलाखती मध्ये ऑलराऊंडर खेळाडू म्हणून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “मला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून खेळायचे आहे. मला आता बरे वाटत आहे आणि शेवटी काय होते ते काळच सांगेल. विश्वचषक येईपर्यंत गती मिळवणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून मी संपूर्ण प्रशिक्षण, नियोजन, तयारी करत आहे. मला देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे.” असे हार्दिक म्हणाला.