समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांचा पाय खोलात, केंद्रिय अनुसूचित जाती आयोगाने उचलले मोठे पाऊल

मुंबई विभागीय अंमली पदार्थ विरोधी विभागाचे प्रमुख समीर वानखडे यांच्या तक्रारीवरून केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सात दिवसात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यापूर्वी सुनावणीकरिता मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.( Sameer Wankhede case, big steps taken by Central Commission for Scheduled Castes)

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ हजर राहिले होते. त्यावेळी चौकशीचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. वानखेडे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये. पोलिसांना आयोगाने नोटीस पाठवली होती. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि समीर वानखेडे हे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्यासमोर मुंबई येथे हजर राहिले होते, त्यानंतर अध्यक्ष विजय सांपला यांनी आदेश दिले.

राज्य सरकारने अहवाल तयार करून लवकरात लवकर आयोगाला द्यावा, तोपर्यंत समीर वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटी प्रमाणपत्रासंबंधी आरोप करत तक्रार केली आहे.

समीर वानखेडे हे पहिल्या पत्नीच्या कुटुंबालाही धमकावत असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. ‘वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. वाद निर्माण झाल्यानंतर पहिली पत्नी सत्य समोर आणेल, या भीतीपोटी वानखेडे यांनी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी पहिल्या पत्नीच्या मामेभावाला अडकवण्यात आले.

एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्या मुलीच्या मामेभावाजवळ ड्रग पोहोचवण्यात आलं. त्यानंतर राज्य सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून त्याला अटक करण्याचं कटकारस्थान रचलं गेले. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. ‘माझ्याविरोधात तुम्ही काही बोललात तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकेन, अशा धमक्या त्यांनी पहिल्या पत्नीच्या कुटुंबाला दिल्या आहेत. प्रचंड दहशत निर्माण केली आहे,’ असं मलिक म्हणाले.

याप्रकरणी जात पडताळणीसंबंधी सुनावणी सुरु आहे. याविरोधात आपल्यावर राजकीय हेतूने खोटे आरोप करत दबाव टाकण्यचा प्रयत्न केला जात आहे, दलित अत्यचार प्रतिबंधक कायद्याने तक्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! शेतात नग्नावस्थेत आढळला रात्री जागरणाला गेलेल्या महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकचा 3 दिवस कोठडीत मुक्काम; हिंदुस्तानी भाऊसोबत पोलीस काय करणार?