अखेर धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलं आहे. धारावी पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आहे. (hindustani bhau remanded in police custody for three days)
आज हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊबरोबर पोलीस काय करणार? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विद्यार्थी आंदोलनापूर्वीचे हिंदुस्तानी भाऊचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाऊच्या अडचणी वाढल्या आहेत.
तसेच सोमवारी माध्यमांशी बोलताना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार या आंदोलनासाठी कारणीभूत असल्याचं मत त्याने व्यक्त केलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने सांगितले होते.
दरम्यान, या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ), (41 वर्षे रा. ठि.19/बी प्यारीनगर गोविंद पाटील खार दांडा,खार पश्चिम मुंबई.) विरोधात रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३,३३२,४२७,१०९, ११४,१४३,१४५,१४६,१४९,१८८,२६९,२७० भा.द.वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंगसह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूुस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला.
तर दुसरीकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमावर दिली होती. मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने समाजमाध्यमावर जाहीर केले होते.
दरम्यान, या ‘हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती दिली होती. विद्यार्थी आंदोलनापूर्वीचे हिंदुस्तानी भाऊचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाऊच्या अडचणी वाढल्या आहेत. कालचं आंदोलन एवढं आक्रमक होतं की विद्यार्थ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये कुठे जातात? वाचून आश्चर्य वाटेल
काय चाललंय काय? ‘थेरगाव क्विन’ला अटक झाली तरी तिच्या अकाऊंटवरून नवीन पोस्ट व्हायरल
कन्हैया कुमारवर जीवघेणा ॲसिड हल्ला; त्यानंतर प्रचंड मारहाणीचा हायव्होल्टेज ड्रामा
“भाडखाऊ भाईजानला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, त्याची मस्ती जिरवा”