Share

सांगलीच्या ‘पुष्पा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तब्बल ‘एवढ्या’ कोटींचं रक्तचंदन केलं जप्त

sangali

पुष्पा-द राईजमधला पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझा क्या, फायर है में… हा डायलॉग आता प्रत्येकाच्या तोंडी आहे. श्रीवल्ली गाणं सुपरहिट ठरलंय. त्या गाण्यातली अल्लू अर्जुनची स्टेप सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. पुष्पा-द राईज चित्रपटातील अल्लू अर्जुनची भूमिका प्रचंड गाजतेय. असाच एक पुष्पा सांगलीत सापडला आहे. (red sandalwood rakt chandan worth crores seized in sangli)

या सांगलीतल्या पुष्पाची देखील राज्यात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. सांगलीत पोलिसांनी तब्बल अडीच कोटींचं रक्तचंदन जप्त केलं आहे. मिरज येथे ही कारवाई करण्यात आली आहे. हे रक्तचंदन विदेशात तस्करी केलं जाणार होतं अशी शंका आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांना रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकानं वन विभागाच्या साहाय्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली.

आणि रविवारी पहाटे महाराष्ट्रात दाखल झालेल्या 1 टन वजनाच्या आणि सुमारे दोन कोटी 45 लाख 85 हजारांचे रक्तचंदन मिरजेत पोलीस आणि वन विभागानं धाड टाकून पकडलं आहे. दरम्यान, पोलिसांना या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जकात नाक्यावर वाहनं तपासण्यास सुरुवात केली. यावेळी महात्मा गांधी पोलिसांना एका टॅम्पोत हे रक्तचंदन सापडलं.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी यासीन इनायत उल्ला खान यास अटक केली आहे. याबाबत बोलताना पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, ‘कर्नाटकमधून आलेलं एक वाहन सापडलं असून त्यातून एक टन चंदन मिळालं आहे. याची किंमत २ कोटी ४५ लाख ८५ हजार आणि १० लाखांचा टेम्पो असा एकूण २ कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.’

तसेच बीडच्या केज नगरपंचायतमधील एका नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात चंदन तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज नगरपंचायतीचा नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब दत्तात्रय जाधव (रा. केज) असे या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव आहे. यांच्या विरोधात आंबेजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन तस्करी केल्याप्रकरणी जाधव यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
तरुणाने आपल्याच बहिणीशी केला साखरपूडा; प्रीवेडिंगनंतर समोर आलं भयानक सत्य
भयंकर अपघात! इलेक्ट्रिक बसने दिली १७ वाहनांना जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी
लोकांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमक्या, इंस्टावर रील्स बनवणारी ‘ही’ स्वयंघोषित लेडी डॉन कोण आहे?
१२ जणांशी अफेअर ठेवूनही ‘या’ अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, आता ५० व्या वर्षी म्हणते…

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now