राज्यातील राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून राज्यात राजकीय झिंगाट सुरू झाला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला जाता आहे. तर महाविकास आघाडीने या निर्णयाचं जोरदार समर्थन करत स्वागत केले आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. (gopichand padalkar criticizes the government for selling wine in supermarkets)
आता यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘“जर खरोखरच राज्यातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही राज्यात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही हे तुम्ही नमूद करणार का? टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो असे,” पडळकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.”
दरम्यान, अखेर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाला त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे,’ असे राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. याचबरोबर जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावं, असंही यावेळी बोलताना राऊत म्हणाले.
तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं देखील यावेळी बोलताना राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘थंडीने गोठून मुलं मरणार नाहीत ना? या भितीने मी पुर्ण रात्र जागून काढतो’, पित्याची कहाणी वाचून डोळ्यातून येईल पाणी
पॉर्न स्टारचा खळबळजनक दावा, तीन टॉपच्या खेळाडूंसोबत घालवली रात्र; नंतर त्यांच्या पत्नींनी पाठवले ‘हे’ मेसेज
”मोदींच्या ५६ इंच रुंद छातीवर चिनी चढून बसले आहेत तरीपण ते गप्प आहेत”
‘या’ कारणामुळे ३० कोटींची मालमत्ता दान करून संपुर्ण कुटुंबाने घेतला संन्यास, वाचून अवाक व्हाल






