Share

राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला चंदनतस्कर; बड्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाल्याने नेत्यांना फुटला घाम

ajit pawar

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या विजयाचा उत्सव नगरसेवक साजरा करताना पाहायला मिळत आहेत. परंतु बीडच्या केज नगरपंचायतमधील एका नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात चंदन तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. (ncp corporate smuggling chandan sandlewood)

केज नगरपंचायतीचा नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब दत्तात्रय जाधव (रा. केज) असे या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव आहे. यांच्या विरोधात आंबेजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन तस्करी केल्याप्रकरणी जाधव यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर जाणून घेऊ या.. नेमकं काय आहे प्रकरण. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांच्या शेतात जाधव हा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी काही इसमांना एकत्र जमवून परिसरातील चंदनाची झाडे तोडायचा.

पुढे ती तोडलेली झाडं देवराव कुंडगर याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तासून, त्यातील चंदनाचा गाबा काढून पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून शेडमध्ये ठेवायचा. मात्र याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावात यांना मिळाली. आणि घटनास्थळी जाऊन पाहिले असता. राष्ट्रवादीचे नगरसेवक जाधव यांचे भिंग फुटले.

दरम्यान, पोलिसांनी 10 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यावेळी तेथे पोलिसांना पत्र्याच्या शेडमध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये 27 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाभा आढळला. त्याची किंमत 67 हजार 500 रुपये आहे.

तर दुसरीकडे सध्या या प्रमाणात जाधव यांच्या बरोबर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चंदन तस्करीप्रकरणी बाळासाहेब जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कोणत्याच नेत्याने यावर भाष्य केलेले नाहीये. परंतु, जाधव यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! कानाखाली मारली म्हणून सासरच्यांनी गळा चिरून सुनेचा केला खुन, असा झाला खुलासा
भारतीय कारची कमाल! २०० फूट खोल दरीत कोसळूनही गाडीतील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही
भारताची चिंता वाढली, चीनने बनवला बर्फावर धावणारा रोबोट, करतो आश्चर्यकारक कारनामे
मोठी बातमी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now