आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांना सर्वोच्च न्यायालायने(Supreme Court) मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालायाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालायने आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांना आता नियमित जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.(supreme court action on bjp mla nitesh rane)
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली होती. यावर नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांचे संरक्षण मिळाले आहे. या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालायाकडून कोणतीही सुनावणी घेतली जाणार नाही.
पुढील दहा दिवस पोलिसांना आमदार नितेश राणे यांना अटक करता येणार नाही. त्यामुळे हे दहा दिवस आमदार नितेश राणे यांच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. सर्वोच्च न्यायालायात आज नितेश राणे यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आज ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नितेश राणे यांच्यावतीने युक्तिवाद केला आणि सरकारच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
नितेश राणे यांच्या विरोधातील कारवाई चुकीची आहे. नितेश राणे यांच्याविरोधातील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा नितेश राणेंचे वकील मुकूल रोहतोगी यांनी केला. नितेश राणे यांच्याविरोधातील गुन्हे राजकीय नसून इतर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास होणे आवश्यक असल्याने अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकील सिंघवी यांनी केला.
सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी १८ डिसेंबर रोजी शिवसेनेचे नेते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणेंचा हात आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालायने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार नितेश राणे यांनी दहा दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायाकडून देण्यात आले आहेत. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
मुलीच्या वाढदिवसादिवशीच आईने तडफडत सोडले प्राण, कारण वाचून डोळे पाणावतील
अमेरिकाचा नागरिकांना इशारा; भारतात जाताना विचार करा, बलात्काराच्या, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत