कुरिअर बॉयने कुरिअर डिलिव्हरी करताना डॉक्टरच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोन वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिले, आणि आता डॉक्टरच्या पत्नीने लग्नाची मागणी करताच तो तिच्यावर बलात्कार करून पळून गेला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रेमात फसवणूक झाल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरण भोपाळच्या टीटीनगर भागातील आहे. या महिलेचा पती डॉक्टर होता, त्याचा 2016 मध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेला 13 वर्षांची मुलगीही आहे. आरोपी कुरिअर बॉय जबलपूरचा रहिवासी असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ब्लू डॉट कंपनीकडून ती कुरिअर मागवीत होती. यादरम्यान जबलपूर मध्ये कुरिअर कंपनीत नोकरी करणारा दीपक सिंह ठाकुरसोबत तिची मैत्री झाली. मैत्री वाढल्यानंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झालं. दीपक तिला भेटण्यासाठी भोपाळला येत असायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीटी नगर परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने कुरिअर बॉयविरुद्ध बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. महिलेचा पती डॉक्टर होता, त्याचा 2016 मध्ये मृत्यू झाला होता. महिलेला 13 वर्षांची मुलगी असून ती खाजगी काम करते.
पोलिसात तक्रार दाखल करताना महिलेने सांगितले की, ती जबलपूरला असताना तिला कुरिअर द्यायला आलेल्या दीपकशी तिची चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. पतीच्या निधनानंतर ती भोपाळमध्ये राहू लागली तेव्हा दीपकही तिला भेटण्यासाठी भोपाळला येऊ लागला. 1 जानेवारी 2017 रोजी दीपकने तिला न्यू मार्केट येथील एका लॉजवर बोलावून लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.
महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर आरोपी दीपक दोन वर्षांपासून तिच्यासोबत भोपाळमध्ये राहत होता. यापूर्वी महिलेने दीपकवर लग्नासाठी दबाव टाकला असता दीपकने लग्नास नकार देण्यास सुरुवात केली. दीपकने लग्नास नकार दिल्यानंतर आता महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपीला अटक झालेली नाही.