गेल्या काही दिवसांपासून तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनचा (allu arjun) पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे. पुष्पा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातले डायलॉग्स व्हायरल होत आहेत. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.(shreyas-talpde-talk-abot-inside-story-pushpa-movie-marathi)
श्रेयसने पुष्पा या पात्राला कसा आवाज दिला, याबाबत खुलासा केला आहे. श्रेयस तळपदे पुष्पा (pushpa) या भूमिकेविषयी म्हणाला आहे की, आमचे डबिंग डिरेक्टर म्हणाले की आपण याला थोडा मराठी तडका देऊ या का? डायलॉग्समध्ये एखादा मराठी शब्द घेऊया का? यावरून असं दाखवता येईल की तो महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर राहणारा आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न आपण करू या का?
अभिनेता श्रेयस तळपदे पुढे म्हणाला की, आम्ही डब करायला सुरवात केली. पहिलाच सीन होता. तो त्याच्या पायावर पाय ठेऊन बसला आहे आणि तो बोलतो ‘ये भी मेरा पैर हे और ये भी मेरा पैर है’… आम्ही त्या ठिकाणी आला मोठा शहाणा वापरलं. त्यावर डबिंग डिरेक्टर म्हणाले हे चांगलं वाटत आहे. पण ते म्हणाले तुम्ही याला इतका मराठी तडका देत आहात, तर हे चांगलं वाटेल का?
डबिंग डिरेक्टरच्या या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता श्रेयस तळपदे की, तुम्ही हे पूर्ण ऐका आणि जेव्हा तुम्ही हे पूर्ण एकत्र पाहाल तर तुम्हला नक्कीच आवडणार. त्यानंतर आम्ही त्यात शब्द वापरायला लागलो कावरा बावरा, आईच्या गावात वगैरे जे चिडून एखादा व्यक्ती बोलतो ते सगळे, हे शब्द मराठी प्रेक्षकांना आपलेसे वाटले, याचा मला आनंद आहे.
पुढे अभिनेता श्रेयस तळपदे म्हणाला, सुरवातीला सुद्धा तो बोलतो काय साहेब कसं काय? मस्त मस्त. एवढचं काय तर मी मराठी आहे म्हणून ती भाषा ओढून तोडून बोलण्याची गरज नव्हती आणि मी मराठी असल्याने या भाषेचा वापर करायला मला नेहमीच आवडतं. महाराष्ट्र्रातील अनेक चाहत्यांना पुष्पा ही भूमिका मराठी असल्याने खूप आनंद झाला होता.
पुष्पा चित्रपटात मुख्य भूमिका करणारा तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याने देखील अभिनेता श्रेयस तळपदेचे कौतुक केले होते. तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत अभिनेता श्रेयस तळपदेचे पुष्पा या चित्रपटाचे हिंदी डबिंग केल्याबद्दल आभार मानले होते. त्यावर अभिनेता श्रेयस तळपदे याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अभिनेता अल्लू अर्जुन आणि मनीष शहाचे आभार मानले होते.
महत्वाच्या बातम्या :-
पुष्पा चित्रपटाचा तीन अल्पवयीन मुलांवर झाला गंभीर परीणाम, केलेले कृत्य पाहून पोलिसही हादरले
भारतातील सर्वाधिक परवडणारी कार; एका लीटरला ३४ किमीचं ॲव्हरेज; किंमत फक्त अडीच लाख
नवनीत राणांची जीभ घसरली! ‘मला विचारुन लफडे केले का तुम्ही?’, ऑडिओ क्लीप व्हायरल