Share

‘बायको सोडून गेल्यानं मला सगळे मोदी म्हणतात’, पटोलेंनी उल्लेख केलेल्या ‘त्या’ गावगुंडाचा दावा

umesh gharde

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापलं होतं. मात्र, आपण पंतप्रधानाबाबत नव्हे तर एका गावगुंडाबाबत बोललो अल्याचा दावा नाना पटोलेंनी केला होता. अखेर चर्चेत आलेला ‘गावगुंड’ मोदी शुक्रवारी नागपुरात अवतरला. पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले होते तो आपणच असून आपलेच टोपण नाव मोदी असल्याचा दावा उमेश प्रेमदास घरडे याने पत्रकार परिषदेत केला. (wife left so people calls me modi says umesh gharde)

याचबरोबर मीडियासमोर येऊन घरडे याने आपणच गावगुंड असून आपल्याला लोक मोदी संबोधत असल्याचं म्हटलं आहे. माझी पत्नी सोडून गेली म्हणून मला गावातले लोक मोदी बोलतात. मी दारुचा व्यवसाय करतो, गावगुंड आहे, आपण कुणाला घाबरत नाही, असं घरडे याने म्हटलं आहे. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असंही त्याने सांगितलं.

पुढे बोलताना तो म्हणाला, “दारूच्या नशेत मी कोणाला काहीही बोलून देतो, दारू प्यायल्यानंतर पटोले यांच्यासह आणखी एकाला मी शिवीगाळ गेली होती. मला पटोले यांची माफी मागायला जाणार होतो, परंतु मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, पोलीस स्टेशनला तक्रार दिली मग गावी गेलो, लोक तिथे धमकी द्यायचे, त्यानंतर मी परत नागपूरला आलो. त्यानंतर वकील सतीश उके यांना भेटलो,” असं त्याने सांगितलं.

दरम्यान, भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार संपल्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे याचे पडसाद उमटेल असून वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. नंतर नाना पटोलेंनी यूटर्न घेत मी देशाच्या पंतप्रधानांविषयी बोललॊ नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोललो असल्याचा दावा केला होता.

त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदीची विचारपूस केली आहे. लाखनी तालुक्यातही उमेश प्रेमचंद घरडे या व्यक्तीला मोदी या नावाने ओळखले जाते. याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतो. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो. दारू पिऊन गावकऱ्यांना शिवीगाळ करतो.

मात्र त्याच्या विरुद्ध पोलिसात अजूनही कुठलीही तक्रार दाखल नाही. तो गावगुंड नाही, पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अचानक उमेश घरडे हे त्यांचे वकील  अ‍ॅड. सतीश उके यांच्या समवेत प्रेस क्लबमध्ये अवतरले व पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले तो मोदी आपणच असल्याचा दावा, केला.

महत्त्वाच्या बातम्या
‘मी मिस इंडिया युनिव्हर्स आहे’, विकिपीडियावरील स्वत:बद्दलची ‘ही’ माहिती वाचून संतापली तनुश्री दत्ता
हाडे गोठवणाऱ्या थंडीत भारताचे संरक्षण करताना कोल्हापुरचा सुपूत्र शहीद; काही दिवसांतच होणार होते..
लखनौ संघाने के एल राहूलला केले कॅप्टन; एवढे पैसे दिलेत की आकडा वाचून डोळे पांढरे होतील
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे? चंद्रकांत पाटलांचा सवाल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now