‘मला तू खुप आवडते, फक्त एक रात्र…’, पोलिस निरीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला विचित्र मागणी

राजस्थान पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एका महिला पोलीस कर्मचारीकडे ‘मला तू खूप आवडते, मला एका रात्रीचा आधार हवा आहे’, अशी मागणी केली आहे. ही घटना राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील भिनमाल पोलीस ठाण्यात घडली आहे. आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव दुलीचंद गुर्जर असे आहे. (police-inspector-strange-demand-to-female-constables)

या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपल्या चेंबरमध्ये बोलावून एक रात्र घालवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप महिला पोलीस कर्मचारीने केला आहे. हे सर्व प्रकरण या महिला पोलीस कर्मचारीने पोलीस अधिक्षकांना सांगितले आहे. यानंतर पोलीस अधिक्षकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुलीचंद गुर्जर यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक आणि इतर दोन हवालदारांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

यापूर्वी देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुलीचंद गुर्जर अनेक वादात सापडले आहेत. महिला पोलीस कर्मचारीने पोलीस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १७ तारखेला पोलीस निरीक्षक दुलीचंद गुर्जर यांनी मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. ‘मला तू खूप आवडते’ असे म्हणत त्यांनी एक रात्र घालवण्याची मागणी केली.

हा घडलेला सर्व प्रकार महिला पोलीस कर्मचारीने भिनमाल पोलीस ठाण्यातील असिस्टंट पोलीस कर्मचारी आणि हवालदाराला सांगितला. यावर त्यांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पोलीस उपअधीक्षकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुलीचंद गुर्जर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी तात्काळ दुलीचंद गुर्जर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. याशिवाय एक सहायक उपनिरीक्षक आणि चार हवालदारांनाही पोलीस ठाण्यातून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाची सध्या पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल चौकशी करत आहेत.

या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी दिले आहे. या प्रकरणामुळे राजस्थान पोलिसांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. या घटनेमुळे महिलांना सुरक्षा देणाऱ्या पोलीस विभागातच महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सुनेचे योगी आदित्यनाथ यांच्याशी आहे जुने कनेक्शन?
जेव्हा स्मिता पाटीलच्या एका पोस्टरने घातला होता धुमाकूळ, हॅन्डपंपखाली करत होती अंघोळ
माजी मुख्यमंत्र्यासहीत तीन बड्या नेत्यांची बंडखोरी; भाजपला भलेमोठे भगदाड