९ लहान बालकांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आली आहे. २००१ साली या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २० वर्षांनंतरदेखील या शिक्षेची अमंलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे जगण्याची उमेद वाढल्याचा दावा करत या गावित बहिणींनी हायकोर्टात दयेची याचिका दाखल केली होती.
त्यामुळे गावित बहिणींना फाशी मिळणार की मरेपर्यंत जन्मठेप राहणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आज मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल देत गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
१९९० मध्ये आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजना गावितच्या मदतीने वेगवेगळ्या भागातून १३ मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ मुलांची हत्या केली होती. यासाठी २००१ साली त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे गावित बहिणींनी सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागितली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींनी भीक मागण्यासाठी या १३ मुलांचं अपहरण केलं. त्यापैकी ज्या मुलांनी पैसे कमावणं बंद केलं त्यांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पुढे पैशांवरून वाद निर्माण झाल्यानं रेणुका शिंदे हिचा नवरा त्यांच्यातून वेगळा झाला आणि त्याने पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपी अंजना गावित आणि तिच्या मुली सीमा गावित आणि रेणुका शिंदे यांना अटक केली. आरोपी अंजना गावितच्या नवऱ्याला पोलिसांकडून माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी अंजना गावित यांचा मृत्यू झाला. पुढे त्यांच्या मुली सीमा गावित आणि रेणुका शिंदे यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणात गावित बहिणींनी २०१४ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. पण राष्ट्रपतींनी तो अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर या दोन्ही गावित बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात दयेची याचिका केली होती. पण न्यायालयाने त्यांचा दयेचा अर्ज फेटाळून लावत त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
धक्कादायक! ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेत्याचे अपघातात निधन, कुटुंबावर पसरली शोककळा
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! मकरसंक्रातीला घरी आलेल्या मुलीसोबत बापाने केले ‘हे’ भयानक कृत्य
व्यथित होऊन बसलेले एन. डी पाटील आर आर पाटील येताच ओरडले, आबा न्याय मिळालाच पाहीजे