टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटातील सर्वच गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. यामध्ये ‘ऊं अंटावा मावा ऊं ऊं अंटावा’ हे गाणंसुद्धा खूपच हिट झालं. प्रेक्षकांमध्ये सध्या या गाण्याची खूपच क्रेझ आहे. यादरम्यान कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पुष्पा चित्रपटातील ‘ऊं अंटावा मावा ऊं ऊं अंटावा’ हे गाणं अल्लू अर्जून आणि समंथा रूथ प्रभू यांच्यावर चित्रित करण्यात आलं. तर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं. तर गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान गणेश आचार्य यांनी अल्लू अर्जून आणि समंथासोबत खूपच मजामस्ती केली. यादरम्यानचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला.
गणेश आचार्य यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते समंथा आणि अल्लू अर्जूनला ‘ऊ अंटावा मावा ऊं ऊं अंटावा’ गाण्याचा हुक स्टेप करून दाखवताना दिसून येत आहेत. मात्र, गणेश आचार्य यांना डान्स करताना पाहून अल्लू अर्जून आणि समंथाला हसू आवरणे कठिण झाले.
व्हिडिओ शेअर करत गणेश आचार्य यांनी लिहिले की, माझ्या आवडत्या व्यक्तींसोबत आणखी एक हिट. सेटवर या दोघांसोबत खूप मजेशीर वेळ घालवायला मिळाला. यासोबत गणेश आचार्य यांनी अल्लू अर्जून आणि समंथालाही या पोस्टमध्ये टॅग केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट करत गणेश आचार्य यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत. दरम्यान, पुष्पा हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ओटीटीवरही हा चित्रपट प्रचंड गाजला. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला असला तरी सर्वत्र ‘पुष्पा’चाच बोलबाला पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक! ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेत्याचे अपघातात निधन, कुटुंबावर पसरली शोककळा
आई म्हणाली, मी प्रेमात आहे, मुलांनी थाटामाटात लावून दिले तिचे दुसरे लग्न; मुंबईच्या मुलांचे देशभरात होतंय कौतूक
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! मकरसंक्रातीला घरी आलेल्या मुलीसोबत बापाने केले ‘हे’ भयानक कृत्य