Share

नशीबच बदललं! एका वर्षात 2000% छप्परफाड रिटर्न; गुंतवणूकदारांना मिळाली आयुष्यभराची कमाई

जगात पैसे कमवण्याचे अनेक प्रकार आहेत, काही माणसे जॉब करून पैसे कमवतात तर काही माणसे व्यापार करून म्हणजेच बिझनेस करून पैसे कमवतात. तर काही माणसे आपले पैसे शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवतात. परंतु काही लोकांना हाच शेयर बाजार जुगार वाटत असतो पण खर तर हा जुगार नसून हा एक बुद्धीबळाचा डाव आहे. ज्यांना समजला त्यांनी कमवल ज्यांना नाही समजला त्यांनी गमवलं.

तस पाहायला गेलं तर शेअर बाजारात जोखीम ही मोठ्या प्रमाणात असते. मात्र फायदा झाला तर मातीचही सोन होऊ शकतं. अनेक स्टॉक असे आहेत की, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे GRM Overseas होय. या एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना 2,171.78 टक्के परतावा दिला आहे.

विशेष बाब म्हणजे या स्मॉल-कॅप राइस मिलिंग कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 34 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 23 लाख रुपये मिळाले असते.

याचबरोबर GRM ओव्हरसीज शेअरचा इतिहास देखील मोठा आहे. सुमारे 10 वर्षांत, GRM ओव्हरसीजचा शेअर 1.93 वरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना सुमारे 40,450 टक्के परतावा दिला आहे. यामुळे या स्मॉल-कॅप राइस मिलिंग कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळालेला आहे.

दरम्यान, गेल्या 6 महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 156 रुपयांवरून 782 च्या पातळीवर गेला आहे. या कालावधीत GRM ओव्हरसीजच्या स्टॉकची किंमत 400 टक्क्यांनी वाढली आहे. आणि गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 डिसेंबर रोजी तो 504 रुपयांवर होता, जो 277 रुपयांच्या वाढीसह 782 वर व्यवहार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
माझ्यावर आरोप करणारी महीला कलाकार भाजपशी संबंधीत; किरण मानेंनी उघड केले कनेक्शन
१२ आमदारांचा पत्ता कट?; काँग्रेसमध्ये उडाली खळबळ, सोनिया गांधींच्या प्लॅनने सगळ्यांनाच बसला धक्का
लता मंगेशकर यांची तब्येत आणखी बिघडली, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती
मानेंना मोठं व्हायचय म्हणून वाद ते निर्माण करताहेत; शिवसेनेचे किरण मानेंवर गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय आर्थिक इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now