दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून आज संपूर्ण देशभरात ओळखला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. ‘पुष्पा’ या चित्रपटानंतर अल्लू अर्जूनच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे. अल्लू अर्जूनसंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर आज या लेखाद्वारे अल्लू अर्जूनच्या आलिशान घराबद्दल जाणून घेऊया.
अल्लू अर्जून हा दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता असून तो सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आलिशान बंगला, गाडी, महागडे कपडे असे आलिशान जीवन तो जगतो. त्याचे आयुष्य एखाद्या राजकुमारापेक्षा काही कमी नाही.
हैदराबादमधील जुब्ली हिल्स या पॉश एरियातील एका आलिशान घरात अल्लू अर्जून त्याची पत्नी आणि मुलांसोबत राहतो. या घराला अल्लू अर्जूनने Blessing असे नाव दिले आहे. रिपोर्टनुसार अल्लू अर्जूनचे हे घर २ एकर जागेत असून त्याची किंमत जवळपास १०० कोटी रूपये आहे.
बाहेरून हे घर अगदी साधे दिसत असले तरी आतून ते सर्व सोयीसुविधांनीयुक्त भरलेले आहे. प्रशस्त हॉल, किचन, गार्डन एरिया आणि स्विमिंगपूल असे त्याचे सुसज्ज घर आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जूनने घरासाठी पांढऱ्या रंगाला पसंती दिली आहे.
अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डीच्या पसंतीनुसार त्यांचे हे घर सजवण्यात आले आहे. तर इंटिरियर डिझाईनर आमिर आणि हामिद यांच्याद्वारे घर सजवण्यात आलं आहे. त्याचे हे घर एखाद्या महालापेक्षा काही कमी नाही.
दरम्यान, अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १७ डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र, अद्यापही चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या स्टाईल, डायलॉग आणि डान्सचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
किरण मानेंनी महीला कलाकारांशी गैरवर्तन केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढले; स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण
एअर होस्टेसवर फिदा झाला दारू तस्कर, तिला पटवण्यासाठी ५० वेळा बिझनेस क्लासने केला प्रवास
स्टार झालेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत पण.., सोनाली कुलकर्णीबद्दल विजू माने असं का म्हणाले?