Share

नाईट सुटमध्येच विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी पोहोचली कतरिना, एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूडमध्ये भूतकाळात जर कोणते जोडपे सर्वाधिक चर्चेत राहिले असेल तर ते म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. त्यांच्या अफेअरच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत होत्या आणि अखेर ९ डिसेंबरला राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे दोघांनीही त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

कतरिना आणि विकीचे लग्न या वर्षात चर्चेत आहे. लग्नानंतर दोघांचे हे पहिले नवीन वर्ष होते, जे दोघांनी एकत्र साजरे केले. पण विकी कौशलला त्याच्या शूटिंगच्या संदर्भात निघावे लागले, त्यानंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी कतरिना त्याला विमानतळावर निरोप देताना दिसली.

विकी आणि कतरिना एकाच कारमध्ये आले, कतरिनाने विकीला मिठी मारली, किस केले आणि त्यानंतर विकी कारमधून खाली उतरला. या फुटेजमध्ये कतरिना नाईट गाऊनमध्ये दिसत आहे आणि त्यामुळेच ती कारमधून उतरलेली नाही. पहा व्हिडिओ:

कतरिना विमानतळावर कारमधून उतरली नाही आणि तिने चेहराही झाकून घेतला. कतरिना नारंगी रंगाच्या नाईट सूटमध्ये दिसत आहे आणि त्यामुळेच ती पापाराझींना टाळण्यासाठी कारमधून बाहेर पडली नाही.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कतरिना आता ‘टायगर ३’ मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे, ज्याची शुटींग अजून बाकी आहे. विकीबद्दल बोलायचे झाले तर तो सारा अली खान सोबत ‘द अमर अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार असून त्याच्या शूटिंगसाठी तो रवाना झाल्याचे समजते.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now