अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे माध्यमात नेहमीच चर्चेत असते. याशिवाय आपल्या वादग्रस्त वक्तव्याद्वारेही ती नेहमी चर्चेत येत असते. नुकतीच तिने इस्लाम धर्माबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे तिला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले होते. त्यानंतर आता उर्फी पुन्हा एकदा तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओद्वारे उर्फीने तिला तिच्या फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
उर्फीच्या सोशल मीडिया फॅन क्लबवर तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत उर्फी म्हणत आहे की, ‘जे लोक माझ्या फोटोवर कमेंट करत आहेत की, मी इस्लामच्या नावाने एक काळिमा आहे, माझ्याविरूद्ध फतवा जारी करण्यात यावा, माझे कपडे असे तसे वगैरे वगैरे… पण तुम्हाला माहित आहे का? की कुराणमध्ये असे कुठेही लिहिलेले नाही की एका स्त्रीला जबरदस्तीने तिच्या चेहरा झाकण्यात यावा.
कुराणमध्ये हे लिहिलेले आहे की, महिलांनी स्वतःचा चेहरा झाकून घ्यावे. पण जर तिची इच्छा नसेल तर जबरदस्तीने तिच्यावर ते लादू नये. तसेच असे कुठेही लिहिलेले नाही की, ती महिला पडदा करत नसेल तर तिच्यावर शिव्यांचा भडिमार करावा आणि तिला इतके लाजिरवाणे करावे की, ती स्वतःचा चेहरा झाकून घेईल. तुम्ही पुन्हा एकदा जाऊन कुराण वाचा. हां… पण कुराणमध्ये हे मात्र जरूर लिहिलेले आहे की, पुरुषांनी आपल्या नजरांवर पडदा करून घेणे जरूरी आहे.
पुढे बोलताना उर्फीने म्हटले की, ‘एक पुरुष लग्नापूर्वी महिलांना चुकीच्या पद्धतीने बघूच शकत नाही. तेव्हा जे लोक इन्स्टाग्रामवर येऊन मुलींना बघत असतात आणि त्यानंतर त्यांच्या फोटोंवर फालतू कमेंटसुद्धा करत असतात ते लोक हराम आहेत. तुम्ही हे सर्व नाही करू शकत. तुम्ही अशा महिलांचे फोटो बघूच शकत नाही. तुम्ही खूप चुकीचे करत आहात. तसेच इस्लामद्वारे जे नियम बनवले गेले आहेत ते दीड हजार वर्षापूर्वीचे आहेत आणि तेव्हा महिलांजवळ कोणतेच अधिकार नव्हते’.
यावेळी उर्फीने इस्लाम धर्मात चार लग्नांना मंजूरी का देण्यात आली याचाही उल्लेख करताना म्हटले की, ‘इस्लाम धर्मात चार लग्नांना मंजूरी आहे कारण त्याकाळी महिलांचे पती मेल्यास इतर पुरुष त्यांच्यावर बलात्कार करत असत. आणि तेव्हा महिलांजवळ इतके अधिकार नव्हते की, ते स्वतः जाऊन त्यांच्यासाठी न्यायाची मागणी करतील.
‘एका महिलेची अब्रू वाचवण्यासाठी तेव्हा चार लग्नांना मान्यता दिली गेली. पण दीड हजार वर्षानंतरही मी दडपणाखाली असलेल्या मुस्लिम महिलेसारखी दिसत आहे का? नाही, मी तसे नाही. मी तुमची मदत मागत नाहिये आणि तुमचा सल्लाही मागत नाहिये. त्यामुळे मला सल्ला देणे बंद करा की, मी माझ्या शरीरासोबत काय करावे, कसे कपडे घालावे वगैरे. इस्लाममध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचे तुम्ही पालन करत नाहीत आणि एका मुलीला शिकवण देता की, असे नाही तसे कपडे घाल’.
https://twitter.com/God_OfDarkHumor/status/1475733609201946627?s=20
उर्फीने पुढे म्हटले की, ‘तुम्हाला माहितच असेल की, इस्लाम धर्मात प्री-मॅरीटल सेक्स हराम आहे पण तरीसुद्धा तुम्ही ते करता. आणि यापैकी किती जण असे आहेत जे पाचवेळा नमाज पठन करतात. मला तर वाटत नाही की, कोणीही असा व्यक्ती असेल. कारण जर तुम्ही पाच वेळा नमाज पठन करत असाल तर तुम्हाला इन्स्टाग्रामवर मुलींच्या फोटोंवर कमेंट करायला वेळच मिळाला नसता’.
‘मी इस्लामचे अनुसरण करत नाही. मी केवळ धर्मात विश्वास ठेवते. अल्लाहसुद्धा एकच गोष्ट सांगतो की, जे काही कराल ते मनापासून करा. जर तुम्ही मनापासून काही करत नसाल आणि केवळ वरती जाण्यासाठी करत असाल तर तुम्हाला कधीच स्वर्ग मिळत नाही. यापेक्षा हे चांगलं की, तुम्ही एखाद्या माणसाची मदत करा. एखाद्या गरीब व्यक्तीची मदत करा आणि महिलांना चुकीच्या नजरेने बघणे बंद करा. तेव्हाच तुम्ही खरे मुसलमान म्हणून ओळखले जाल’.
महत्त्वाच्या बातम्या :
मधूचंद्राच्या रात्रीच नवरीचे दुखत होते पोट, सत्य समोर येताच नवऱ्याला बसला जबर धक्का
आपल्याच सावत्र बापाच्या प्रेमात पडली मुलगी, नंतर असा काढला जन्मदात्या आईचा काटा
‘५२ कोटी वजा करा आणि बाकीचे मला परत करा’, अत्तरवाल्या पियुष जैनचा न्यायालयात अर्ज