Share

अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत

strawberry

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असे आपण म्हणतो. मात्र जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण जर व्यवस्थित असले तर व्यक्तीला  यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. शिक्षण नसतानाही अनेक व्यक्तींनी यशाचं शिखर गाठलं आहे.

अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. या लेखात आपण अशाच एका हटक्या महिलेची यशाची कहाणी पाहणार आहोत. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण ही महिला फक्त आठवी पास. मात्र आज ती शेतीतून लाखोंचे उत्पादन घेत आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी ती एक प्रेरणास्रोत बनली आहे.

तर वाचा यशोगाथा.. मंत्रवती असे या महिलेचे नाव आहे. मंत्रवती यांचे वय 42 वर्ष असून त्या अवघ्या आठवी पास आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील इटावा जिल्ह्याच्या जसवंतनगर तालुक्याच्या मौजे नगला भिकन येथे त्या सध्या राहतात. तर जाणून घेऊया त्यांनी शेतात नेमका कोणता प्रयोग केला आहे?

सर्वप्रथम मंत्रवती यांना कृषी विभागाकडून स्ट्रॉबेरी शेतीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर त्यांना कृषी विभागाकडून स्ट्रॉबेरीची 480 रोपे मिळाली. कृषी विभागाकडून माहिती घेऊन त्यांनी या रोपांची लावगड केली.

तसेच पाण्याचे योग्य नियोजन सोबतच बाकी स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असणारी माहिती त्यांनी कृषी विभागाकडून मिळवली. बघता बघता मंत्रवती यांनी स्ट्रॉबेरीच्या पिकातून यशस्वी उत्पादन घेतले. विशेष बाब म्हणजे त्यांची स्ट्रॉबेरी 800 रुपये प्रति किलो या दरात विकली गेली.

दरम्यान, मंत्रवती यांनी स्ट्रॉबेरीच्या पिकातून लाखोंचे उत्पादन घेतले. आठवी पास महिलेने मिळवलेले हे यश पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आज मंत्रवती यांच्याकडे स्ट्रॉबेरीच्या पिकाची माहिती घेण्यासाठी येतात. तसेच त्याही पंचक्रोशीतील महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवूडवर शोककळा! सदाबहार गाणी लिहीणाऱ्या गीतकाराचे मेंदूतील रक्त गोठल्यामुळे निधन
धक्कादायक! टिकली आणि हिजाब घातल्याने चौथीच्या विद्यार्थीनींना शिक्षकाने केली मारहाण, गुन्हा दाखल
तुम्ही तिकीटे काढा मी काहीतरी खायला आणते म्हणली आणि.., पत्नीने नवऱ्याला दिला गुलीगत धोका
आजी-माजी शहराध्यक्षांची ‘चाय पे चर्चा’, साईनाथ बाबर यांनी घेतली वसंत मोरेंची भेट, चर्चांना उधाण

आर्थिक इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट राज्य शेती

Join WhatsApp

Join Now