‘फ्री रेवडी’ संस्कृती आपल्या देशाच्या विकासाला घातक आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हंटले. कल्याणकारी योजना जनतेपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिल्लीच्या आप सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे. (8500 crores aircraft, 12 crores car they use themselves)
या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील सडेतोड उत्तर दिले. ‘मी सुशिक्षित व्यक्ती असून माझ्याकडे स्वतःच्या नावाची डिग्री आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे पंतप्रधानांवर टीका करताना, कॅगच्या अहवालाचा दाखला देत जनतेला अनेक गोष्टी मोफत देऊन सुद्धा दिल्लीचा अर्थसंकल्प कशाप्रकारे फायद्यात आहे. हे देखील केजरीवालांनी सांगितले.
जो व्यक्ती ८५०० कोटींचं विमान, १२ कोटींची गाडी आणि १० लाखांची कपडे घेतो. ती व्यक्ती केजरीवालांना मोफत सुविधा देण्याविषयी प्रश्न विचारत आहे काय? असे बोलत थेट आप पक्षाने पंतप्रधानांवर निशाणा साधला.
१ लाख ३० हजाराचे पेन आणि दीड लाखाचा चष्मा वापरण्याचा आरोपही ट्विटरद्वारे आप पक्षाने नरेंद्र मोदींवर केला आहे. मोदींनी त्यांच्या उद्योगपती मित्राला ११ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी मागील ७ वर्षांत दिली, असाही आरोप आपकडून त्यांच्यावर करण्यात आला.
मोदी दिल्लीच्या विकासाचे मॉडेल जाणीवपूर्वक देशासमोर मांडू देत नाहीत. मोदींनी केजरीवालांना सिंगापूरला जाण्यास परवानगी दिली नाही. तसेच जी व्यक्ती जनतेच्या कराचे पैसे उद्योगपती मित्राला कर्जमाफी देण्यासाठी वापरते. त्यांनी जनतेसाठी मोफत सुविधा पुरवण्याला ‘फ्री रेवडी’ म्हणून हिणवू नये, असे देखील आपने म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ कर्णधारावर क्रिकेट खेळायला कायमची बंदी घालावी; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटरची मागणी
एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का! शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांना फोडले, भाजपात प्रवेश
..हे व्हायग्रा अन् वासनेचे इंजेक्शन, मोदीजी तुम्ही माझे आयुष्य उद्धवस्त केले; अभिनेत्रीचे मोदींवर गंभीर आरोप






