सौदी अरेबियामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्या 81 जणांना फाशी देण्यात आली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्यांना फाशी देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे हा आकडा गेल्या वर्षभरात फाशीची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारांच्या एकूण संख्येइतका आहे. तसेच सौदी अरेबियाच्या एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात दुजोरा देताना म्हटले की, हे सर्व जण इस्लामिक स्टेट, अल-कायदा किंवा इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती सांगतात सौदी प्रेस एजन्सीन म्हंटलं आहे की, फासावर देण्यात आलेल्या ८१ पैकी ७३ जण सौदी अरेबियाचे नागरिक आहेत. सात जण येमेनचे नागरिक असून एक जण सीरियाचा आहे. याचबरोबर या नागरिकांना ही शिक्षा का देण्यात आली?
याबाबत देखील सौदी प्रेस एजन्सीन माहिती दिली आहे. ‘मोठ्या आर्थिक केंद्रांवर हल्ला करण्याची योजना दोषींकडून आखली जात होती. यातील काहींनी सुरक्षा दलाच्या सदस्यांची हत्या केली होती. तर काही जण शस्त्रांच्या तस्करीत सहभागी होते, या कारणामुळे सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने या सर्व लोकांना फाशी दिली.
याचबरोबर अपहरण, अत्याचार, बलात्कार, तस्करी, शस्त्रास्त्रे आणि बॉम्बस्फोट अशा गुन्ह्यांमध्ये या लोकांचा सहभाग होता. या सर्वांवर सौदी न्यायालयात खटले चालवले आणि एकूण १३ न्यायाधीशांनी या प्रकरणांची सुनावणी केली. मात्र मानवाधिकार संघटना आणि अनेक पाश्चिमात्य देश यावरून त्यांच्यावर शाब्दिक निशाणा साधत आहे.
दरम्यान, सरकारने फाशीच्या शिक्षेसाठी शनिवार का निवडला? या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र देशाचे संपूर्ण लक्ष युक्रेन-रशिया युद्धाकडे लागलेले असताना ही धक्काडायक घटना घडली आहे. याचबरोबर राजा सलमान आणि त्यांचा मुलगा, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या कारकिर्दीत विविध प्रकरणांमध्ये दोषींचा शिरच्छेद सुरूच होता.
महत्त्वाच्या बातम्या
वयाच्या तिसऱ्या वर्षी आईवडील वारले, पण जिद्दीने अभ्यास करत बनली पोलीस अधिकारी; वाचा संघर्षकथा..
पृथ्वीराज चव्हाण नाही तर ‘हे’ वेगळंच नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आलं समोर; वाचून धक्का बसेल
मुंबई काबीज करण्यासाठी भाजपचा मोठा डाव; उत्तरप्रदेशातील मंत्री मुंबईत घेणार मेळावे
९० लाख लोकसंख्येच्या ‘या’ शहरात कोरोनाचा प्रकोप; सरकारने लावले पुन्हा लाॅकडाऊन