सध्या राज्यात याच आजीची जोरदार चर्चा सुरू आहे. या आजीचा पराक्रम वाचून तुम्हाला देखील नक्कीच सैराट चित्रपटातील आजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या 77 वर्षीय आजीचा उत्साह हा विलक्षण आहे.
वाचा सविस्तर, या 77 वर्षीय आजी आजही दररोज पोहण्याचा सराव करत असते. कौतुकाची बाब म्हणजे, आज्जीने राज्यस्तरीय स्पर्धेत 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर मेडल मिळवले आहे. नाशिकच्या जलतरण तलावात दररोज आजी सराव करते. हरी सोनकांबळे हे आजीचे कोच आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, जयंती काळे असे आजीचे नाव आहे. आजीला एकच मुलगी आहे. विशेष बाब म्हणजे, या आजीला स्विमिंग पूलाबरोबरच नदीत आणि विहिरीत पोहण्याचा छंद असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांशी बोलताना आजीबाईने सासूचा एक किस्सा सांगितला आहे.
खूप पूर्वीची आठवण सांगताना जयंती या म्हणतात की, मला माझ्या सासुबाईंनी एकदा शेती बघायला नेलं होतं. अन् विशेष बाब म्हणजे, जयंती यांनी विहीरीत उडी मारली होती, सुनेने उडी मारून सासूबाई प्रचंड घाबरल्या होत्या. सासूबाईला काहीच समजत नव्हते.
सासू बाई जोरजोरात ओरडू लागल्या होत्या. मात्र मी पाण्यावर तरंगतांना सासूबाईला म्हंटलं की, घाबरू नका मला पोहता येते. अन् तेव्हा कुठे सासूने सुटेकचा निश्वास सोडला. सध्या राज्यात या आजीची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या या आजीवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…





