सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी नियोक्ता असलेल्या भारतीय रेल्वेने गेल्या ६ वर्षांत रेल्वेतील सुमारे ७२ हजार पदे काढून टाकली आहेत. ज्या वेळी भारतातील तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत आणि भारतात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, अशा वेळी ही बातमी लाखो तरुणांसाठी हृदयद्रावक ठरू शकते.
भारतीय रेल्वे ही १० लाखांहून अधिक लोकांना रोजगार देणारी सरकारी संस्था आहे. मात्र आता रेल्वेने हजारो पदे रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. ५-६ हजार नाही तर ७२००० हून अधिक पदे रद्द करण्यात आली आहेत. वृत्तानुसार, ही पदे ग्रुप सी आणि डीशी संबंधित आहेत. २०१९ मध्ये रेल्वेच्या १ लाख पदांसाठी २ कोटींहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. रेल्वेतील बहुतांश भरती या गट सी आणि डी अंतर्गतच केल्या जात असल्याने आणि त्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम या उमेदवारांवर होऊ शकतो.
रेल्वे बोर्ड राजपत्रित (गट A आणि B) आणि अराजपत्रित (गट C आणि D) पदांची भरती करते. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, २०१५-१६ ते २०२०-२१ या कालावधीत रेल्वेच्या १६ झोनमधून सुमारे ५६ हजार ८८८ पदे रद्द करण्यात आली आहेत. त्याच वेळी, आणखी १५,४९५ पदे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे की, यापैकी ९००० हून अधिक पदे उत्तर रेल्वेने रद्द केली आहेत. त्याच वेळी, दक्षिण रेल्वेने ७५२४ पदे रद्द केली आहेत. पूर्व रेल्वेने ५७०० पदे रद्द केली आणि दक्षिण-पूर्व रेल्वेने ४६६७ पदे रद्द केली.
केंद्र सरकार आपली प्रणाली आणखी डिजीटल करण्यात गुंतले आहे. मात्र, डिजिटल झाल्यामुळे आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असेही ते सांगत आहेत. पण लक्षात घेण्यासारखे आहे की, रद्द करण्यात आलेल्या ७२ हजार पदांमागे रेल्वेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला असेल.
वृत्तानुसार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे ही पदे रद्द करण्यात आली आहेत. रेल्वेच्या डिजिटलायझेशनमुळे ही पदे आता अनावश्यक झाली आहेत, असे सांगण्यात आले. त्याच वेळी, अहवालानुसार, २०२१-२२ या वर्षासाठी रेल्वेचा अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. यानंतर आणखी ९००० पदे रद्द केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सध्याचे केंद्र सरकार आल्यापासून रेल्वेमध्ये आउटसोर्सिंगलाही चालना मिळाली आहे. त्यामुळे रेल्वेतील मंजूर पदांची संख्याही कमी झाली असून ही सर्व पदे कमी होत आहेत, हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
हे वृत्त येताच विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या उदित राज यांनी ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. त्यात त्यांनी लिहिले की, रेल्वेने ७२ हजार पदे रद्द केली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी ८१ हजार पदे रद्द करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो सावधान! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ; वाचा नेमकं घडलं काय?
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ, १० रुपयांऐवजी मोजावे लागणार इतके रुपये
आजीचा हात पकडून शाळेत निकाल घ्यायला चालली होती चिमुकली, रेल्वेने धडक दिली आणि.., वाचून काळीज फाटेल
ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या चिमुकलीला स्वत:चे हेलिकॉप्टर देऊन नाना पटोले रेल्वेने मुंबईला रवाना