आपल्या आजूबाजूला दररोज अनेक घडामोडी घडत असतात. काही काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना असतात तर काही सकारात्मक असतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला आता घर बसल्या समजल्या जातात. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
ही घटना वाचून तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गरीबीपुढे कोणाचं काहीही चालत नाही. हे अगदी खरं आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे, एका व्यक्तीकडे आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. पैशांच्या अभावी वृद्ध मुलाने आईचा मृतदेह व्हिलचेअरवरून स्मशानभूमीत नेला.
वाचा नेमकं घडलं..?
हा हृदयद्रावक प्रकार तमिळनाडूच्या त्रिचीमधील असल्याची माहिती मिळाली आहे. मणप्पराई परिसरात मुरूगानंदन हे राहतात. राजेश्वरी असं त्यांच्या आईचे नाव होते. त्या 74 वर्षांच्या होत्या. अनेक दिवसांपासून त्या सोरायसिसशी झुंज देतं होत्या. अखेर गुरुवारी त्यांचे निधन झाले.
मात्र मुलगा मणप्पराई यांच्याकडे आईच्या अंत्यविधीसाठी पैसे नव्हते. वाचून तुमच्या अंगावर काटा येईल, मणप्पराई यांनी तब्बल दीड किलो मीटर व्हिलचेअरवरून आईला स्मशानभूमीत नेलं. त्यानंतर मणप्पराई स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना संपूर्ण हकीकत सांगितली.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मणप्पराई यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी मुरुगानंदन यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. सध्या या घटनेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सध्या आजूबाजूच्या परिसरात याच घटनेची चर्चा सुरू आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून असे अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होतं असतात.
दरम्यान, ग्रामीण भागात सुविधा नसल्याने अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर येतं असतात. काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना उघडकिस आली होती. सुविधा नसल्याने एका गर्भवती महिलेने रस्त्यातच बाळा जन्म दिला. त्यानंतर चादरमध्ये काही नागरिकांनी त्या महिलेला दवाखण्यात नेले.
महत्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल