Share

आघाडीतच बिघाडी! काँग्रेसने शिवसेनेवर लावला तब्बल ५०० कोटींच्या घोटाळ्याचा खळबळजनक आरोप

shivsena congress

राज्यात भाजपाला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. सुमारे 2 वर्षांचा कार्यकाळ ठाकरे सरकारने पूर्ण केला आहे. मात्र राज्यात मांडीला मांडी लावून काम करणारे शिवसेना आणि काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मात्र एकमेकांविरोधात उभे असणार आहेत.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. मनपाची निवडणूक पुढच्या वर्षी २०२२ हॊणार आहे. अशातच राज्यात महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर ८०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

शुक्रवारी मुलुंड आणि भांडूप येथील भूखंडांवर प्रकल्पबाधितांसाठी विकासकामार्फत नऊ हजार सदनिका बांधण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र, साडेतीन हजार काेटी रुपयांच्या या प्रकल्पात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असताना आता सत्ताधारी पक्ष आपली मुस्कटदाबी करीत असल्याच्या आरोप करीत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच मुंबईत काँग्रेसकडून शिवसेनेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळापासून सातत्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळत आहे.

याबाबत बोलताना काँग्रेसचे रवी राजा म्हणाले, मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मालमत्तांच्या ‘मापात पाप’ करुन अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला. एकट्या वरळीतच असा १०० कोटी रुपयांचा घोटाळा असेल! प्रशासनावर योग्य अंकुश न ठेवल्याने सत्ताधारी शिवसेनाच याला जबाबदार आहे.’

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूकच्या आगामी काळात काँग्रेस शिवसेनेविरोधात आणखी आक्रमक होणार का? या राजकीय समीकरणाचा दोन्ही पक्षांना फायदा होणार की नुकसान? याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला आगामी काळात मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या
मुंबईच्या ‘या’ साध्या रेस्टॉरंटमध्ये अंबानी कुटुंबीय घेतात जेवणाचा आस्वाद, नाव वाचून अवाक व्हाल
शिवसेनेत इनकमिंग! पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप, राष्ट्रवादीला गळती; राजकीय समीकरण बदलणार?
गाढवावर मुख्यमंत्र्याचा फोटो लावणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धक्कादायक कारण आले समोर
किडनीच्या मोबदल्यात चार कोटी रुपयांचे अमिष दाखवत गायिकेने मोलकरणीला गंडवले

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now