Share

bacchu kadu : मुख्यमंत्र्यांनी काट्याने काटा काढला..! मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बच्चू कडूंना शिंदेंनी दिलं खास गिफ्ट

bacchu kdu eknath shinde

bacchu kadu : शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. बच्चू कडू शिंदे गटात सामील झाले खरे मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे ते नाराज असल्याच बोलल जातं आहे. त्यानंतर भाजप आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वाद झाला.

दोघांमधील वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेला. अखेर रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले. मात्र अजूनही कडू आणि राणा यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याच पाहायला मिळत नाहीये. अशातच आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बच्चू कडूंना शिंदेंनी खास गिफ्ट दिलं आहे.

बच्चू कडू यांच्या मतदारसंघात ५०० कोटी रुपयांचा निधी देऊन बच्चू कडू यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी दिला जाणार आहे.

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर सपन मध्यम प्रकल्पाला 500 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बच्चू कडू कमालीचे नाराज असल्याच बोलल जातं आहे.

यावर अद्याप कडू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. कडू यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याच्या राजकारणात बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेक दिवसांपासून ते चर्चेत आहेत.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now